Pune Pimpri Chinchwad Crime News | अडीच वर्षापूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून तरुणाचा खून, खडकी परिसरातील घटना; दोन अल्पवयीन मुले ताब्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | अडीच वर्षापूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन 17 वर्षाच्या दोन अल्पवयीन (Minor) मुलांनी एका तरुणाला कोयता आणि लाकडी दांडक्याने मारहाण करुन खून (Murder) केला. भरदिवसा घडलेल्या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवारी (दि.2) दुपारी औंध-बोपोडी रोडवर (Aundh-Bopodi Road) घडली. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

धीरज प्रदीप भोसले Dheeraj Pradeep Bhosale (वय-25 रा. औंध रोड, बोपोडी, पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी 17 वर्षाच्या दोन अल्पवयीन मुलांवर खडकी पोलीस ठाण्यात (Khadki Police Station) खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, मयत धीरज भोसले वेल्डिंगचा व्यवसाय करत होता.
तर आरोपी मुले त्याच्या घराच्या परिसरात राहत होती.
मंगळवारी दुपारी धीरज औंध-बोपोडी रोडवरुन जात असताना आरोपींनी त्याला आडवले.
एकाने त्याच्या हातात असलेल्या लाकडी दांडक्याने तर दुसऱ्याने कोयत्याने धीरज याच्यावर वार केले.
यामध्ये गंभीर जखमी झालेल्या धीरज याला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

आरोपी आणि धीरज भोसले यांच्यात 2021 मध्ये किरकोळ कारणावरून वाद झाले होते.
याच वादाचा राग आरोपींच्या मनात होता. त्यानंतर एकमेकांकडे खुन्नस देऊ पाहणे, येता-जाता धमकी देण्याचा प्रकार
सुरु होता. यातून ही घटना घडली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. पुढील तपास खडकी पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | थर्टी फर्स्टच्या रात्री टोळक्याचा कर्वेनगर भागात राडा, दोन जणांना बेदम मारहाण; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद (Video)

Hit and Run Law | हीट अँड रन : वडेट्टीवार यांचा आरोप, अधिकाऱ्यांना पुढे करून जनतेच्या रोषापासून वाचण्याचा सरकारचा प्रयत्न

Raju Shetty | मोतोश्रीवरील भेटीनंतर राजू शेट्टी म्हणाले, ”जागावाटपाची चर्चा नाही, आम्हाला अदानींचा त्रास म्हणून…”

दाम्पत्याला शिवीगाळ करुन घरावर दगडफेक, कोंढवा परिसरातील घटना