Pune Pimpri Chinchwad Crime News | आयपीएल मॅचवर बेटिंग घेणाऱ्यांवर पोलिसांचा छापा, 5 जणांवर FIR

लोणावळा : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | सध्या सुरु असलेल्या आयपीएल (IPL-2023) सामन्यावर सट्टा (Betting) घेणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारला जात आहे. आयपीएलवर सट्टा घेणाऱ्यांवर पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch (LCB) छापा टाकून 1 लाख 57 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर पाच जणांवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. ही कारवाई (Pune Pimpri Chinchwad Crime News) पुणे ग्रामीण पोलिसांनी (Pune Rural Police) लोणावळा येथील एका बंगल्यात बुधवारी रात्री केली.

 

याप्रकरणी पुणे ग्रामीण एलसीबीचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश वाघमारे (API Prakash Waghmare) यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात (Lonavala City Police Station) फिर्याद दिली आहे. राजविनसिंग मनजितसिंग बांगा (वय 27, क्लब व्यवसाय, रा. वडाळा ट्रक टर्मिनल, मुंबई), मस्कीनसिंग रजेद्रसिंग अरोरा (वय 30, क्लब व्यवसाय रा पंजाबी कॉलनी, सायन कोळीवाडा), शशांक महाराणा (रा. प्रतिक्षानगर सायन ईस्ट), ईफ्तेकार ऊर्फ इमरान खान (पुर्ण नाव व पत्ता माहित नाही), षेन्टी (पुर्ण नाव माहित नाही) रा. सायन ईस्ट कोळीवाडा यांच्यावर भादवी कलम 420, 465, महाराष्ट्र जुगार कायदा (Maharashtra Gambling Act) कलम 4(अ), भारतीय टेलिग्राफ अॅक्ट (Indian Telegraph Act) कलम 25(क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्ध लखनऊ जाएंट (Lucknow Super Giants) या दोन संघात सवाई मानसिंह स्टेडियम जयपुर (Sawai Mansingh Stadium Jaipur) येथे सामना सुरु होता. सामन्यावर बेटिंग घेतली जात असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. या पथकाने तुंगार्ली येथील एका बंगल्यावर छापा टाकला.

 

त्यावेळी आरोपी वेगवेगळ्या नावाने घेतलेल्या मोबाईल सिम द्वारे आणि लॅपटॉपवर बेटिंग घेताना आढळून आले.
आरोपी काही अॅप्लिकेशनचा वापर करुन बेटिंग घेत होते. शासनाकडून बेटिंगवर बंदी असताना आरोपी बेटिंग करत असल्याचे आढळून आले.
याकारवाईत पोलिसांनी 1 लाख 57 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक चौधरी (PI Chaudhary) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Pimpri Chinchwad Crime News | Police raid on IPL match bettors, FIR against 5 people

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Political News | ‘काहीही झालं तरी महाराष्ट्रात भूकंप होणारच’, अंबादास दानवेंचं मोठं वक्तव्य

Pune Mahavitaran News | महावितरणच्या बहुउद्देशीय प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

MLA Amol Mitkari | ‘ही सैतानी साम्राज्याची सुरुवात, ज्या दिवशी…’, ‘त्या’ प्रकरणावरून अमोल मिटकरींचा सरकारला इशारा