Pune Pimpri Chinchwad Crime News | विक्रीसाठी गांजा बाळगला, गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या; साडे सात लाखांचा गांजा जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | विक्रीसाठी गांजा (Marijuana) बाळगणाऱ्या एकाला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (PCPC Police) अंमली पदार्थ विरोधी पथकातील (Anti Narcotics Cell) पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई वल्लभनगर येथील गोलमंडई येथे बुधवारी (दि.6) रात्री आठच्या सुमारास करण्यात आली (Pune Pimpri Chinchwad Crime News)

जितेंद्र मगन कोळी Jitendra Magan Koli (वय-33 रा. इसाळ, ता. शिरपुर जि. धुळे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई कपिलेश कृष्णा इगवे Kapilesh Krishna Igwe (वय-33) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी आरोपीवर एनडीपीएस अॅक्ट (NDPS Act) नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र कोळी हा संत तुकाराम नगर येथील मुख्य अग्निशमन केंद्रासमोर थांबला होता.
त्याच्याजवळ गांजा असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने कोळी याला
ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून 7 लाख 43 हजार 800 रुपयांचा 7 किलो 438 ग्रॅम
वजनाचा गांजा व 15 हजार रुपये किंमतीचा मोबाईल असा एकूण 7 लाख 58 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याच्याकडे केलेल्या तपासात गांजा विक्रीसाठी आणल्याचे उघडकीस आले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अनिरुद्ध सावर्डे (API Anirudh Savarde) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | व्यावसायिकाची 7 लाखांची फसवणूक, येरवडा पोलिसांकडून आरोपीला अटक

गैरसमजातून 10 किलो वजनाची प्लेट मारली डोक्यात, तरुण गंभीर जखमी; धनकवडी येथील जिममधील घटना

Pune Crime News | मनसे पदाधिकाऱ्याकडे खंडणीची मागणी, दोन माहिती अधिकार कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल; धायरीतील प्रकार