Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे : बनावट कागदपत्रांद्वारे बँकेची फसवणूक, बिल्डरसह चार जणांवर FIR

ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | बनावट कागदपत्रांद्वारे हाउसिंग लोन घेऊन बँकेची आर्थिक फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकासह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार साऊथ इंडीयन बँकेच्या विश्रांतवाडी (South Indian Bank Vishrantwadi) शाखेत फेब्रुवारी 2019 ते मार्च 2019 या कालावधीत घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत बँक मॅनेजर आतीश क्रिश्ण पिल्लाई (वय-45 रा. केरळ) यांनी सोमवारी (दि.8) विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर एस.के. डेव्हलपर्सचे प्रतिक पदमकर खराडे (रा. किवळे, पुणे), दवेंद्र राजु गायकवाड (रा. खडकी बाजार), राजु रामचंद्र गायकवाड, नरेश जगन्नाथ भंडारी (रा. घोरपडी गाव, पुणे) यांच्यावर आयपीसी 420, 419, 468, 471, 472 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

ADV

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी हे साऊथ इंडीयन बँकेच्या विश्रांतवाडी शाखेत मॅनेजर आहेत.
तर दवेंद्र गायकवाड, राजु गायकवाड आणि नरेश भंडारी हे सेलिंग एजंट आहेत.
आरोपींनी संगनमत करुन त्यांच्या हाउसिंग लोन प्रपोजल फाईलसाठी लागणारे दस्त अॅग्रीमेंट टू सेल याच्यावर
खोट्या सह्या व खोटे शिक्के मारुन बँकेला सादर केले.
आरोपींनी खोटी कागदपत्रे बँकेला देऊन ती खरी असल्याचे भावून बँकेकडून 13 लाख 22 हजार रुपयांचे कर्ज मंजूर
करुन घेतले. मंजूर झालेल्या कर्जाच्या रक्कमेपैकी 12 लाख 90 हजार रुपयांचा डी डी एस.के डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर
प्रतिक खराडे यांच्या नावाने काढला. प्रतिक खराडे याने त्याच्या बँक खात्यात डीडी वटवून बँकेची फसवणूक
केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Radha Krishna Vikhe Patil | तलाठी भरती : मंत्री राधाकृष्ण विखे यांचा विरोधकांना थेट इशारा, सरकारची बदनामी केली तर गुन्हे दाखल करू!

अल्पवयीन मुलींकडे पाहून अश्लील हावभाव केल्याप्रकरणी एकाला अटक, येरवडा परिसरातील घटना

Pune News | कात्रज डेअरीच्या जागेवरील मैदानाचे आरक्षण!, ‘राजकिय व प्रशासकिय’ व्यवस्थेने घातलेल्या घोळात दुध संघ व स्थानीक नागरिक वेठीस!

Fursungi Devachi Uruli Garbage Depot | फुरसुंगी देवाची उरुळी कचरा डेपोवर ‘बॉलिवूड’चे शुटिंग; अक्षय कुमार, सारा अली खानच्या ‘स्कायफोर्स’च्या शूटिंगसाठी मागणी

दीडशे रुपये मोबदला देऊन तरुणाचे साडे तेरा लाख हडपले, हडपसर मधील प्रकार

वाईन शॉपमधून विदेशी दारूसह रोकड लंपास, दापोडी मधील घटना