Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे : बांधकाम व्यावसायिक आत्महत्या प्रकरण : सावकाराचा न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | बांधकाम व्यवसायासाठी व्याजाने घेतलेल्या पैशांची काही प्रमाणात परतफेड केली. परंतु, सावकाराने चक्रवाढ व्याज लावून पैशाची वारंवार मागणी करून धमकी दिल्याने बांधकाम व्यावसायिकाने आत्महत्या (Construction Professional Suicide News) केल्याची घटना पुण्यातील वडगाव शेरी परिसरात घडली होती. याप्रकरणी सावकारावर चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दाखल गुन्ह्यात आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश किशोर एन. शिंदे (Judge Kishore N. Shinde) यांनी फेटाळून लावला आहे, अशी माहिती अ‍ॅड. मिथून चव्हाण यांनी दिली. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

शशिकांत दत्तात्रेय कातोरे (वय-41 रा. गार्डिनिया सोसायटी, वडगाव शेरी) असे आत्महत्या करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे. तर विनय विष्णुपंत काळे (वय-38 रा. नवरत्न सोसायटी, वडगाव शेरी) याच्यावर आयपीसी 306, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत दत्तात्रय साहेबराव कातोरे (वय-69 रा. वडगाव शेरी) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station) फिर्याद दिली आहे.

फिर्यादी यांचा मुलगा शशिकांत यांचा सद्गगुरू इन्फ्रा या नावाने बांधकाम कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे. या कामासाठी ते बँक लोन घेण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी आरोपीने फिर्यादी यांच्या मुलाला बँक लोन घेऊ नका, मी तुम्हाला पैसे देतो त्यावर मला पाच टक्क्यांप्रमाणे परतावा द्या असे सांगितले. त्यामुळे फिर्यादी यांच्या मुलाने आरोपीकडून पैसे घेतले. मयत शशिकांत कातोरे यांनी आरोपीला ठरल्या प्रमाणे पाच टक्क्या प्रमाणे वेळोवेळी रोख व ऑनलाईन पैसे दिले.

मागील काही महिन्यापूर्वी नवीन साईट सुरु करण्यासाठी फिर्यादी यांच्या मुलाने आरोपीकडून पाच टक्के प्रमाणे पैसे घेतले. मात्र, ही साईट सुरु झाली नसल्याने आरोपीने रक्कमेवर चक्रवाढ व्याज लावून शशिकांत यांच्याकडे पैशांची मागणी केली. तसेच घरी जाऊन पेसे दिले नाहीतर तुम्हाला तुरुंगात पाठवण्याची धमकी फिर्यादी यांना दिली. यानंतर पुन्हा फोन करुन ‘तु माझ्या पैशांचे काय करणार आहे, तुला माहित आहे ना मी कसा आहे. तु जर पैसे दिले नाहीतर तु समजून जा’ असे म्हणत आरोपीने फिर्यादी यांच्या मुलाकडे व्याजाच्या पैशासाठी तगादा लावला. आरोपीचा त्रास सहन न झाल्याने शशिकांत कातोरे यांनी आत्महत्या केली.

आरोपी विनय काळे याने न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला होता.
या अर्जाच्या सुनावणी दरम्यान अ‍ॅड. मिथून चव्हाण यांनी न्यायालयाला सांगितले की, गुन्ह्याचा तपास सुरु आहे.
आरोपीने मृत व्यक्तीकडून घेतलेले कोरे धनादेश अद्याप जप्त केलेले नाहीत.
गुन्ह्याशी संबंधित इतर कागदपत्रे आरोपींच्या ताब्यातून जप्त करणे बाकी आहे.
त्यामुळे तपास करण्यासाठी आरोपीला अटक करुन त्याची कोठडीत चौकशी करणे अत्यंत आवश्यक आहे.
त्यामुळे आरोपीला जामीन मंजूर करु नये, असा युक्तिवाद अ‍ॅड. चव्हाण यांनी केला.
न्यायाधीशांनी युक्तिवाद ग्राह्य धरुन आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
या खटल्यात अ‍ॅड. मिथून चव्हाण यांना अ‍ॅड. प्रशांत पवार यांनी मदत केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

जुन्या भांडणाच्या कारणावरुन मोठा भाऊ, वहिनीच्या डोक्यात दगड घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

Pune PMC – Swachh Bharat Mission | स्वच्छ भारत मिशनच्या नावाखाली महापालिकेची तिजोरी ‘स्वच्छ’? 600 टन टिपिंग फी दिली जात असताना प्रशासन 875 रुपये टिपिंग फीचा प्रस्ताव मान्य करणार !

तीन अल्पवयीन मुलींसोबत अश्लील कृत्य, नराधमास अटक; कोंढवा परिसरातील प्रकार

Maharashtra Police Suicide News | गळफास घेऊन पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या, प्रचंड खळबळ

पुणे : अश्लील हावभाव करुन महिलेचा विनयभंग, पतीला जीवे मारण्याची धमकी

व्यसनासाठी जमीन विक्रीचा तगादा लावणार्‍या भावाचा खून; शिरुरमधील घोडनदीच्या पात्रात सापडला होता मृतदेह, बीडमधून तिघांना अटक