Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे : लग्नास नकार दिल्याने तरुणीला मारहाण, आई आणि मुलावर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लग्नाला नकार दिल्याच्या कारणावरुन तरुणीला घरी बोलवून घेत तिला शिवीगाळ करुन मारहाण केली. तसेच हातातील लोखंडी कड्याने तोंडावर मारुन गंभीर जखमी केले. हा प्रकार शनिवारी (दि.20) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास खडकी येथे घडला आहे. याप्रकरणी खडकी पोलिसांनी आई आणि मुलावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत खडकी परिसरात राहणाऱ्या 26 वर्षीय तरुणीने रविवारी (दि.21) खडकी पोलीस ठाण्यात (Khadki Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन शुभम प्रकाश सकटे याच्यासह त्याच्या आईवर आयपीसी 324, 294, 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी तरुणीने आरोपी शुभम सकटे याच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला होता. याचा राग आरोपींच्या मनात होता.

आरोपी शुभम याच्या आईने शनिवारी फिर्य़ादी तरुणीला घरी बोलावून घेतले. मुलासोबत लग्न करण्यास नकार दिल्याच्या रागातून तिला शिवीगाळ केली. तसेच तिला हाताने मारहाण केली. आरोपी शुभम सकटे याने त्याच्या हातातील लोखंडी कड्याने तरुणीच्या तोंडावर मारले. यामध्ये तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तरुणीने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Mundhwa Police | वाईन शॉप फोडणाऱ्या दोन सराईतांना मुंढवा पोलिसांकडून अटक (Video)

Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे : वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार, एकला अटक 3 अल्पवयीन ताब्यात