Pune Pimpri Chinchwad Crime News | पुण्यात नशा करण्यासाठी बेकायदेशीर इजेक्शनची विक्री, एकाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | नशा करण्यासाठी बेकायदेशीर औषधी इंजेक्शनची विक्री करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ‘मेफेनटरमाइन सल्फेट इंजेक्शन आयपी टरमीव्हा’ (Mephentermine Sulfate Injection IP Termiva) नावाच्या इंजेक्शनचे एकूण 60 हजार 900 रुपयांच्या 30 बाटल्या जप्त केल्या आहेत. हडपसर पोलिसांनी ही कारवाई भुमकर मळा, नऱ्हे गाव येथे सोमवारी (दि.8) दुपारी दीडच्या सुमारास केली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत पोलीस शिपाई अतुल अशोक पंधरकर यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी किरण विठ्ठल शिंदे (वय-21 रा. कृष्णकुंज अपार्टमेंट, नऱ्हे) याच्यावर आयपीसी 328, 273, 276, 336 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नऱ्हे गावातील एमएसईबी ऑफिसच्या मागे आरोपी किरण शिंदे हा पार्क असलेल्या
गाड्यांमध्ये मेफेनटरमाइन सल्फेट इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन किरण शिंदेला ताब्यात घेतले.
त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे मेफेनटरमाइन सल्फेट इंजेक्शनच्या 30 बाटल्या आढळून आल्या.
आरोपीकडे औषध विक्रीचा परवाना नाही.
तसेच कोणत्याही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे औषध वापरल्यास विषारी द्रव्यांचे दुष्परीणाम होऊन व्यक्तीचा मृत्यू
होऊ शकतो किंवा आरोग्यास गंभीर इजा होऊ शकते हे माहित असताना नशा करण्यासाठी गैरवापर करण्याच्या उद्देशाने इंजेक्शनची विक्री करत होता.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कुदळे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune BJP On MLA Ravindra Dhangekar | आमदार रवींद्र धंगेकर म्हणजे हवा भरलेला फुगा, टेंपररी आमदार – भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे

Muralidhar Mohol-Sanskriti Pratishthan | संस्कृती प्रतिष्ठान, शि. प्र. मंडळीतर्फे डॉ. कुमार विश्वास यांच्या ‘अपने अपने राम’ कार्यक्रमाचे 18 ते 20 जानेवारीला आयोजन (Video)

लाइट कट करण्यासाठी आलेल्या वीज कर्मचाऱ्याला मारहाण, कोंढवा परिसरातील घटना

Pune Chronic Garbage Spots | पुण्यात कचरा टाकण्यात येणारे आणि साठला जाणारे नऊशे ‘क्राॅनिक स्पाॅट’ ! 161 ‘स्पाॅट’ कचरा मुक्त करण्यास महापालिका प्रशासनाला यश