Pune Pimpri Chinchwad Crime News | घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारासह सराफ गजाआड, पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेकडून 13 लाखांचा ऐवज जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात घरफोडी (Burglary) करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या (Pimpri Chinchwad Crime Branch Unit 2) पथकाने अटक केली आहे. तसेच चोरीचे दागिने खरेदी करणाऱ्या सराफ व्यावसायिक व दागिने विकणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या पत्नीला देखील पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून दोन गुन्हे उघडकीस आले असून पोलिसांनी 13 लाख रुपये किंमतीचे 22 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने (Gold Jewelry) जप्त केले आहेत. ही कारवाई चिंचवड स्मशाभूमीजवळ करण्यात आली. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

जयवंत उर्फ जयड्या गोवर्धन गायकवाड (वय-38 स्टार आहुरा सोसायटी, आंबेगाव), सराफ व्यावसायिक गौरवकुमार शामसुंदर विजयवर्गीय (वय-36 रा. आंबेगाव पठार), सोन्याचे दागिने विक्री करण्यासाठी मदत करणारी जयड्याची पत्नी विद्या जयवंत गायकवाड (रा. आंबेगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

सांगवी पोलीस ठाण्याच्या (Sangvi Police Station) हद्दीतील स्मिता अमोल बोत्रे (रा. श्री हाईटस, जुनी सांगवी) यांच्या राहत्या घरातील कपाटामधून 20.5 तोळे वजनाचे दागिने आणि 10 हजार रुपयांची रोकड असा एकूण 8 लाखांचा ऐवज चोरून नेला होता. ही घटना 2 डिसेंबर 2023 रोजी घडली होती. दाखल गुन्ह्याचा युनिट दोन कडून समांतर तपास सुरु असताना तांत्रीक व सीसीटीव्ही फुटेजवरुन हा गुन्हा रेकॉर्डवरील गुन्हेगार जयवंत उर्फ जयड्या गायकवाड याने केल्याचे निष्पन्न झाले.

जयवंत उर्फ जयड्या गायकवाड याचा शोध घेत असताना तो पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत असल्याची माहिती मिळाली. आरोपी चिंचवड येथील स्मशानभुमी जवळ येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी स्मशानभूमी परिसरात सापळा रचला असताना आरोपीला पोलीस आल्याचा सुगावा लागला. आरोपी तेथून पळून जावु लागला, पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन ताब्यात घेतले.

70 पेक्षा अधिक गुन्हे

आरोपी जयवंत उर्फ जयड्या गायकवाड हा रेकॉर्डवरील सराईत घरफोडी करणारा गुन्हेगार आहे. त्याच्याविरोधात पुणे (Pune Police) आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 70 पेक्षा अधिक घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. तो काहीही कामधंदा करत नसून घरफोडी करणे हेच त्याच्या उपजिवीकेचे साधन आहे.

वेशांतर करुन वावरत होता

पोलिसांनी आपल्याला पकडू नये यासाठी आरोपी घरफोडी करण्यासाठी इतर कोणत्याही साथीदाराला सोबत घेत नव्हता.
तो एकटा चोरी करत होता. प्रत्येकवेळी राहण्याचे ठिकाण बदलून व वेशांतर करुन वावरत होता.
आरोपीकडे सखोल चौकशी केली असता त्याने सांगवी आणि पिंपरी (Pimpri Police Station) हद्दीत घरफोडी
केल्याची कबुली दिली. तसेच चोरलेले दागिने पत्नी विद्या हिच्या मार्फत सराफ व्यावसायिक गौरवकुमार
याला विकल्याचे सांगितले.

दोन गुन्हे उघडकीस

पोलिसांनी मुख्य आरोपी जयवंत गायकवाड याच्या पत्नीला व दागिने खरेदी करणाऱ्या सराफ व्यावसायिकाला अटक
केली आहे. मुख्य आरोपीकडून सांगवी आणि पिंपरी पोलीस ठाण्यातील दोन गुन्हे उघडकीस आले असून आरोपींकडून
13 लाख रुपये किंमतीचे 22 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे (IPS Vinoy Kumar Choubey), सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे
(Joint CP Dr. Sanjay Shinde), अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी (Addl CP Vasant Pardeshi),
पोलीस उप आयुक्त गुन्हे स्वप्ना गोरे (DCP Swapna Gore) , सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे सतिश माने
(ACP Satish Mane), सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे -1 बाळासाहेब कोपनर (ACP Balasaheb Kopner)
यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम (PI Jitendra Kadam),
पोलीस उपनिरीक्षक गणेश माने (PSI Ganesh Mane), पोलीस अंमलदार देवा राऊत, जयवंत राऊत, प्रमोद वेताळ,
आतिष कुडके, उषा दळे, शिवाजी मुंढे, नामदेव कापसे, उद्धव खेडकर, अजित सानप, जमीर तांबोळी, दिलीप चौधरी
यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

कुख्यात गँगस्टर शरद मोहोळवर गोळीबार करणार्‍याचे नाव निष्पन्न, सोबत असलेल्यांनीच केला घातपात

‘बारामती अ‍ॅग्रो’वर ईडीची कारवाई, सुप्रिया सुळे म्हणाल्या, ”ही पाहिली वेळ नाही, यापूर्वी माझ्या बहिणींच्या…”