Supriya Sule | ‘बारामती अ‍ॅग्रो’वर ईडीची कारवाई, सुप्रिया सुळे म्हणाल्या, ”ही पाहिली वेळ नाही, यापूर्वी माझ्या बहिणींच्या…”

मुंबई : Supriya Sule | आज सकाळी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांच्या बारामती अ‍ॅग्रो कंपनीवर (Baramati Agro Company) तसेच संबंधित ठिकाणांवर ईडीने (ED) छापेमारी केली. यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सातत्याने सरकारविरोधी आक्रमक भूमिका घेत असलेल्या रोहित पवारांवर झालेल्या या कारवाईनंतर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पक्षाकडून पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्या एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होत्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, ईडी आणि सीबीआयने टाकलेल्या धाडीतील ९५ टक्के लोक विरोधी पक्षातील आहेत. त्यामुळे छापेमारीचे आम्हाला आश्चर्य वाटत नाही. ही पहिली वेळ नाही. यापूर्वी माझ्या बहिणींच्या घरावर ईडीची छापेमारी झाली आहे. आता रोहित पवारांवर ईडीची छापेमारी होत आहे. (Supriya Sule)

बारामतीमधून लोकसभा मतदार संघातून शरद पवार (Sharad Pawar) निवडणूक लढणार असल्याच्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना मिश्किल टिपण्णी करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, बारामती हा माझा मतदारसंघ नसून कुटुंब आहे. १५ वर्षे झाले मी बारामती मतदारसंघात काम करत आहे. बारामतीतील जनतेने माझ्यावर विश्वास टाकल्यामुळे आयुष्यभर मी त्यांची ऋणी राहिल. त्यामुळे, माझे तिकीट कापण्याचा का प्रयत्न करत आहात?

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Asha Workers Strike | राज्यव्यापी बेमुदत संप! राज्य सरकारने आश्वासन न पाळल्याने आशा स्वयंसेविका आक्रमक

Pune Pimpri Chinchwad Crime News | पीडब्ल्युडीमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून 5 लाखांची फसवणूक, एकाला अटक; तळेगाव मधील प्रकार

MLA Jitendra Awhad | हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याची पोलिसांत तक्रार, जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात पहिला गुन्हा पुण्यात दाखल

Shiv Sena MP Sanjay Raut On BJP | बेरोजगारी, महागाई यावर सरकारकडे एकच उपाय…धर्म, संजय राऊतांचे भाजपावर टीकास्त्र

Sharad Mohol Dead In Firing | कुख्यात गँगस्टर शरद मोहोळची भरदिवसा ‘गेम’