Pune Pimpri Chinchwad Crime News | दोन अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ, नराधम बापाला अटक; गंजपेठेतील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जन्मदात्या बापानेच आपल्या दोन अल्पवयीन मुलींसोबत अश्लील चाळे करुन त्यांचे लैंगिक शोषण (Sexual Abuse) केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. याप्रकरणी खडक पोलिसांनी नराधम बापावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. हा प्रकार लोहियानगर, गंजपेठ येथे बुधवारी (दि.17) सायंकाळी सहाच्या सुमारास घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत 17 वर्षीय पीडित मुलीने खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) फिर्याद दिली आहे. पीडित मुलीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी 47 वर्षीय नराधम बापावर आयपीसी 354, 354अ, 509, 504, 506 सह पोक्सो अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला दोन मुली आहेत. मुली अल्पवयीन असल्याचे माहित असताना देखील आरोपीने मुलींसोबत अश्लील चाळे करुन त्यांच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. तसेच फिर्यादी मुलीसोबत अश्लील बोलून तिला जवळ ओढून घेतले. त्यावेळी पीडित मुलीच्या आईने त्याला विरोध केला असता आरोपीने पीडित मुलीला व तिच्या आईला शिवागाळ केली. मुलीने आरोपीला विरोध केला असता नराधम बापाने मुलीकडे पाहून अश्लील हावभाव करुन शिवीगाळ केली. तसेच हा प्रकार कोणाला सांगू नका अशी धमकी दिली.

जर पोलीस केली तर मी बाहेर आल्यावर तुम्हा सगळ्यांचे जगणं मुश्कील करीन, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत काळे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Fire News | रेंजहिल्स रस्त्यावर अशोकनगर भागात तीन दुकानांना आग

Kondhwa Khadi Machine Chowk | पीएमआरडीएच्या विकास आराखड्यातील कोंढवा खडी मशीन ते मंतरवाडी दरम्यानच्या रस्त्याची रुंदीची माहीती घेउन योग्य ते बदल करण्याचे प्रयत्न करण्यात येतील – महापालिका आयुक्त विक्रम कुमार

पिंपरी : भरधाव कंटेनरची दुचाकीला धडक, दुचाकीस्वार जेष्ठ नागरिकाचा मृत्यू