Pune Pimpri Chinchwad Crime News | नववर्षाच्या पार्श्वभूमीवर ‘राज्य उत्पादन शुल्क’कडून पुण्यात विदेशी मद्याचा साठा जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | गोवा राज्यात विक्रीकरीता असलेल्या विदेशी दारुचा साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (State Excise Department) भरारी पथकाने पकडला आहे. बिबवेवाडी व कात्रज परिसरात करण्यात आलेल्या या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाने दुचाकीसह 5 लाख 85 हजार 850 रुपये किंमतीचा विदेशी मद्याचा साठा (Foreign Liquor Stock) जप्त केला आहे. ही कारवाई पथकाने गुरुवारी (दि.28) केली. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

31 डिसेंबर व नववर्षाच्या (New Year) पार्श्वभूमीवर अवैध विदेशी मद्य व बिअर वाहतुक व विक्री करणाऱ्यां विरुद्ध कारवाई करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने विशेष भरारी पथके तयार केली आहेत. त्यांच्या मार्फत पुणे जिल्ह्यात ठिक-ठिकाणी तपासणी करुन कारवाई करण्यात येत आहे. गुरुवारी (दि.28) पुणे विभागाने बिबवेवाडी येथील शिवतेज नगर या ठिकाणी छापा घातला असता त्या ठिकाणी गोवा राज्य (Goa State) निर्मितीस व विक्रीस परवानगी असलेल्या विदेशी मद्याच्या 180 मिली क्षमतेच्या 96 सिलबंद बाटल्या आढळून आल्या. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याप्रकरणी आरोपीकडे चौकशी केली असता बिबवेवाडी येथील एका घरात साठा करुन ठेवल्याची माहिती दिली.
पोलिसांनी त्याठिकाणी छापा टाकून विविध ब्रँडचे 750 मिलीचे 36 सिलबंद बाटल्या व 180 मिलीच्या 480 सिलंबद
बाटल्या (13 बॉक्स) आढळून आले. आरोपीकडे अधिक चौकशी केली असता कात्रज येथे मद्याचा साठा केल्याची
माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने त्याठिकाणी छापा टाकून 750 मिलीचे 25 बॉक्स, 180 मिली चे 7 बॉक्स आढळून आले. या कारवाईत पथकाने 750 मिली क्षमतेच्या 417 सिलबंद बाटल्या (35 बॉक्स), 180 मिली क्षमतेच्या 828 बाटल्या (17 बॉक्स), एक दुचाकी, अॅपल आयफोन असा एकूण 5 लाख 85 हजार 850 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त विजय सूर्यवंशी (Commissioner Vijay Suryavanshi),
संचालक सुनील चव्हाण (Director Sunil Chavan) यांच्या आदेशाने विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर
(Divisional Deputy Commissioner Vijay Chinchalkar), पुणे अधीक्षक चरणसिंग राजपूत
(SP Charan Singh Rajput), उप अधीक्षक संजय पाटील (DySP Sanjay Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली
राज्य उत्पादन विभाग, एच विभाग पुणे निरीक्षक अशोक कटकम, दुय्यम निरीक्षक प्रशांत दळवी, संजय राणे,
सी विभागाचे नवनाथ मारकड, विशेष भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक प्रियंका राठोड, राहूल खाडगीर,
सहायक दुय्याम निरीक्षक राजेश पाटील, जवान विशाल गाडेकर, माधव माडे, गोपाल कानडे, शरद भोर, शामल शिंदे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pramod Nana Bhangire-Kondhwa Dafanbhumi | शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या इशार्‍या नंतर कोंढवा येथील दफनभूमीचा प्रस्ताव अखेर पुणे महानगरपालिकेकडून रद्द !

Pune Police MPDA Action | कात्रज परिसरातील अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 74 वी स्थानबध्दतेची कारवाई

Pune News | महिलेसोबत गैरवर्तणूक करणाऱ्या कर्मचाऱ्याला निलंबित करा, आझाद समाज पार्टीची पीएमपीएमएल प्रशासनाकडे मागणी