Pune Pimpri Chinchwad Crime News | तडीपार गुंडाची पोलिसांशी झटापट, शिवीगाळ करुन गेला पळून

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन- Pune Pimpri Chinchwad Crime News | तडीपार असतानाही पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या (Pimpri Chinchwad Police Commissionerate) हद्दीत प्रवेश करणाऱ्या गुंडाला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांशी (PCPC Police) झटापटी करुन आईच्या मदतीने गुंड पळून गेला. ही घटना निगडी ओटास्किम येथील शिवशक्ती सायकल दुकानाजवळ सोमवारी रात्री ७ वाजता घडली. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी मनोज वसंत जाधव Manoj Vasant Jadhav (रा. ओटोस्किम, निगडी) व त्यांच्या आई विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस हवालदार जमीन तांबोळी यांनी निगडी पोलीस ठाण्यात (Nigdi Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कोरेगाव भिमा शौर्यदिनानिमित्त (Bhima Koregaon Shaurya Din) बंदोबस्ताच्या अंनुषंगाने गस्त घालत होते. फातिमा मजिदजवळील शिवशक्ती सायकल दुकानाजवळ ते आले असताना तडीपार केले असताना रेकॉर्डवरील गुंड मनोज जाधव हा तेथे उभा असल्याचे त्यांना दिसले. तडीपार केले असताना तो इथे कसा आला, इथे काय करतोय असे त्यांनी विचारले. त्यावरुन तो पोलिसांशी झटापट करुन शिवीगाळ करुन लागला. त्यामुळे लोकांची गर्दी जमली. त्या गर्दीतून त्याची आई त्या ठिकाणी आली. ती पोलिसांशी हुज्जत घालू लागली. पोलिसांनी माझ्या मुलाला तडीपार केले व सारखे पकडता, असे म्हणून झटापट करु लागली. या झटापटीत मनोज व त्यांची आई पळून गेली.

तडीपार कालावधीत पूर्व परवानगी न घेता मिळून येऊन सरकारी कर्तव्यात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

जाहिरातींच्या हक्कांच्या बदल्यात शौचालयांची देखभाल दुरूस्ती; प्रशासनाने घनकचरा विभागाचा प्रस्ताव रद्द केला

बेकायदा बांधकामे आढळल्यास तातडीने कारवाईचे आदेश

Pune PMC News | पुणे महापालिकेचा कारभार होतोय ‘डिजिटल’ ! 60 पैकी 16 विभागात ई ऑफिस प्रणाली कार्यन्वीत – महापालिका आयुक्त विक्रम कुमार

Pune News | कात्रज दूध डेअरी लगतच्या खेळाच्या मैदानावरील आरक्षण उठवून दूध डेअरी व प्रक्रियाचे आरक्षण टाकणार

‘मतांचे’ राजकारण आणि अर्थकारणामुळे पुणे शहर होतेय वेगाने बकाल