Pune Pimpri Chinchwad Crime News | वृद्ध महिलेची सोनसाखळी चोरणाऱ्यास दोन तासात अटक, चिखली पोलिसांकडून एक लाखांचा ऐवज जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | फुटपाथवरुन पायी जाणाऱ्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत दुचाकीवरुन आलेल्या चोरट्याने हिसका मारून चोरुन नेली होती. चिखली पोलीसांनी (PCPC Police) तपास करुन चैन स्नॅचिंग (Chain Snatching) करणाऱ्या आरोपीच्या अवघ्या दोन तासात मुसक्या आवळल्या. आरोपीकडून गुन्ह्यात चोरलेली 1 लाख 8 हजार रुपयांची सोन्याची पोत जप्त केली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.5 दुपारी दीडच्या सुमारास जाधववाडी चिखली येथे घडली होती. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

विनोद सिताराम जाधव (वय-34 रा. जाधववाडी चिखली मुळ रा. तिवसाळा, ता. घाटनजी जि. यवतमाळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत वृद्ध महिलेने चिखली पोलीस ठाण्यात (Chikhli Police Station) फिर्याद दिली आहे. दाखल गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची दोन पथके तयार करण्यात आली होती. तपास पथकाने घटनास्थळाच्या आजूबाजूला असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले.

त्यावेळी सीसीटीव्हीत दिसणारा व्यक्ती विनोद जाधव असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देऊन चोरलेली सोन्याची पोत पोलिसांकडे दिली. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या दोन तासात आरोपीला अटक करुन पोलिसांनी गुन्हा उघडकीस आणला. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे (IPS Vinoy Kumar Choubey), सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे
(Joint CP Dr. Sanjay Shinde), अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी (Addl CP Vasant Pardeshi),
पोलीस उपायुक्त परिमंडळ-3 संदीप डोईफोडे (DCP Sandeep Doifode), सहायक पोलीस आयुक्त विवेक मुगळीकर
(ACP Vivek Muglikar) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर
(Senior PI Dnyaneshwar Katkar), पोलीस निरीक्षक राजेंद्र बर्गे (PI Rajendra Berge), पोलीस उपनिरीक्षक पुजारी,
पोलीस अंमलदार गणेश साबळे, गणेश शिंदे आनंदा नागरे, राकेश बनसोडे, नारायण तांबे, गुन्हे शाखा युनिट एकचे
सोमनाथ बोऱ्हाडे, महादेव जावळे, बाळु कोकाटे, अजित रुपनवर, नामदेव वडेकर यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरेंची सध्याच्या राजकारणावर चौफेर फटकेबाजी! ”नेते लाचार, मिंधे, पैशासाठी वेडे झालेत”

पिंपरी : घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या व्यावसायिकावर FIR

MNS Chief Raj Thckeray | राज ठाकरेंचा महायुती सरकारवर हल्लाबोल, ”आत्ताचं सरकार म्हणजे सहकार चळवळ नाही, ती ‘सहारा’ चळवळ”

Sharad Mohol Murder Case | कुख्यात गँगस्टर शरद मोहोळचा गोळया झाडून खून करणार्‍यांच्या काही तासात गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या, आरोपींमध्ये 2 वकिलांचा समावेश (व्हिडीओ)