Sharad Mohol Murder Case | कुख्यात गँगस्टर शरद मोहोळचा गोळया झाडून खून करणार्‍यांच्या काही तासात गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या, आरोपींमध्ये 2 वकिलांचा समावेश (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Sharad Mohol Murder Case | पुण्यातील कुख्यात गुंड शरद हिरामण मोहोळ (वय-40 रा. सुतारदरा, कोथरुड) याच्यावर शुक्रवारी (दि.5) दुपारी गोळ्या झाडून (Firing) खून करण्यात आला. शरद मोहोळ सुतारदार येथून त्याच्या घरी जात असताना त्याच्या सोबतच असलेला साथीदार मुन्ना उर्फ साहील पोळेकर याने त्याच्या इतर दोन साथीदारांसह मोहोळ (Sharad Mohol Murder Case) वर गोळ्या झाडल्या. या गुन्ह्यातील आरोपींना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) पथकाने आठ तासात अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये दोन वकीलांचा समावेश असल्याने खळबळ उडाली आहे.

शरद मोहोळ खून प्रकरणात (Sharad Mohol Murder Case) आठ जणांना रात्री पुणे सातारा रस्त्यावरील शिरवळ परिसरातून अटक करण्यात आली. त्यांच्याकडून तीन गावठी पिस्टल, तीन मॅगझीन, पाच जिवंत काडतुसे, 8 मोबाईल, महिंद्रा एक्सयुव्ही, स्वीफ्ट गाडी, रोख रक्कम असा एकूण 22 लाख 39 हजार 810 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शरद मोहोळ याच्यासोबत असलेल्या जुन्या वादाच्या कारणावरून त्याचा खून केल्याचे प्रथमदर्शनी उघड झाले आहे.

साहील उर्फ मुन्ना संतोष पोळेकर (वय-20 रा. शिवशक्ती नगर, सुतारदरा, कोथरुड), नामदेव महीपती कानगुडे (वय-35 रा. भुगाव ता. मुळशी), अमित उर्फ अमर मारुती कानगुडे (वय-24 रा. स्वराज्य मित्र मंडळ, पर्वती), चंद्रकांत शाहु शेळके (वय-22 रा. जनता वसाहत, पर्वती), विनायक संतोष गाव्हणकर (वय-20 रा पौड, ता. मुळशी), विठ्ठल किसन गांदले (वय-34 रा. शिवकल्याण नगर, सुतारदरा, कोथरुड), अॅड. रविंद्र वसंतराव पवार Adv. Ravindra Vasantrao Pawar (वय-40 रा. नांदेगाव ता. मुळशी), अॅड. संजय रामभाऊ उडान Advt. Sanjay Rambhau Udan (वय-43 रा. भुसारी कॉलनी, कोथरुड) यांच्यावर कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) आयपीसी 302, 307, 34 सह आर्म अॅक्ट (Arm Act), महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत (Maharashtra Police Act) गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

कुख्यात गुन्हेगार शरद मोहोळ याच्या हत्येनंतर आरोपी पळून गेले होते. पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokle), पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende) यांनी आरोपींचा तात्काळ शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार गुन्हे शाखेची 9 पथके तयार करुन आरोपींच्या शोधासाठी पुणे शहर परिसर, मुळशी, सातारा, पुणे ग्रामीण व कोल्हापुरच्या दिशेने रवाना केली होती.

दरम्यान, खंडणी विरोधी पथक दोन चे (Anti Extortion Cell) अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी गुन्हा केल्यानंतर चारचाकी गाडीतून पळून गेल्याचे समजले. पथकाने सीसीटीव्ही विश्लेषणातून आरोपी मुंबई-बेंगलोर हायवे (Mumbai-Bangalore Highway) रोडने सातारा रोडच्या दिशेने गेल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपींच्या चारचाकी गाडीचा नंबरचा मिळवला. दरम्यान, गुन्ह्यातील आरोपी खेड शिवापुर टोलनाका पास करुन पुढे जात असल्याची माहिती मिळाली.

पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी खंडणी विरोधी पथक एक व गुन्हे शाखा युनिट एक (Unit 1) च्या पथकांना
आरोपींच्या शोधासाठी साताऱ्याच्या दिशेने रवाना केले. तसेच सातारा पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क साधून
सातारा मार्गावर व शिरवळ, आणेवाडी टोलनाका, महाबळेश्वर फाटा, वाई परिसरात नाकाबंदी केली.
आरोपींचा शोध घेत असताना पुणे सातारा रोडवर किकवी जवळ संशयित स्वीफ्ट गाडी (एमएच 12 व्ही.क्यु 9500) गाडीचा 5 किमी पाठलाग करुन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. गुन्हे शाखेच्या पथकांनी गुन्हा घडल्यानंतर आठ तासात आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे,
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-1 सुनिल तांबे (ACP Sunil Tambe), हायक पोलीस आयुक्त गुन्हे-2 सतीश गोवेकर
(ACP Satish Govekar) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप मानकर (PI Pratap Mankar),
अजय वाघमारे (PI Ajay Waghmare), शब्बीर सय्यद (PI Shabbir Syed), श्रीहरी बहीरट (PI Srihari Bahirat),
महेश बोलकोटगी (PI Mahesh Bolkotgi), सोमनाथ जाधव (PI Somnath Jadhav), उल्हास कदम (PI Ulhas Kadam),
सुनिल थोपटे (PI Sunil Thopte), क्रांतीकुमार पाटील (PI Krantikumar Patil), सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत
पाटील, पोलीस उपनिरीक्षक मोहनदास जाधव, श्रीकांत चव्हाण, राहुल पवार, राजेंद्र पाटोळे,
पोलीस अंमलदार चेतन शिरोळकर, सुरेंद्र जगदाळे, सचिन अहिवळे, संग्राम शिनगारे, सैदोबा भोजराव, अमोल पिलाणे,
अमोल आव्हाड, राजेंद्र लांडगे, रविंद्र फुलपगारे, दुर्योधन गुरव, सयाजी चव्हाण, विजय कांबळे, प्रविण ढमाल, राहुल मखरे,
अनिकेत बाबर, अभिनव लडकत, शशिकांत दरेकर, ज्ञानेश्वर चित्ते, सुमित ताकपेरे, श्रीकांत दगडे, साई कारके,
ऋषिकेश ताकवणे, नितीन मुंडे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | कमकुवत दोर तुटल्याने सातव्या मजल्यावरुन पडून मजुराचा मृत्यू, ठेकेदारावर गुन्हा दाखल; वाकड मधील घटना

मुलगा होत नसल्याने विवाहितेचा छळ, महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; पतीला अटक, चाकण परिसरातील घटना

ACB Trap News | सरकारी अनुदानाच्या अनुकूल अहवालासाठी लाच घेणारे जाळ्यात; सीबीआयची कारवाई