MNS Chief Raj Thckeray | राज ठाकरेंचा महायुती सरकारवर हल्लाबोल, ”आत्ताचं सरकार म्हणजे सहकार चळवळ नाही, ती ‘सहारा’ चळवळ”

कर्जत : MNS Chief Raj Thckeray | महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांपासून सहकार चळवळ उभी राहिली आहे. मात्र आत्ताचं सरकार म्हणजे सहकार चळवळ नाही. ती ‘सहारा’ चळवळ, आम्ही अडकलो आहोत, आम्हाला सहारा द्या. ती ही सहकार चळवळ नाही. सगळ्यांनी मिळून सरकार चालवायचं म्हणजे सहकार चळवळ नाही, जोरदार फटकेबाजी मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thckeray) यांनी केली. रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे मनसेच्या सहकार शिबिरात राज ठाकरे बोलत होते. (Maharashtra Political News)

राज ठाकरे म्हणाले, सहकार चळवळ महात्मा फुलेंनी उभी केली. महाराष्ट्रातील जमिनी सावकारांच्या घशात जाऊ नये
म्हणून पहिले आंदोलन ज्योतिराव फुलेंनी केले. महाराष्ट्रात दोन लाखांपेक्षा जास्त सहकारी संस्था आहेत. त्यानंतर गुजरातचा नंबर आहे, ज्यांचा महाराष्ट्रावर डोळा आहे. ते महानंदा डेअरी अमूल गिळकृंत करणार का? अशी स्थिती आहे.

राज ठाकरे म्हणाले, येथील सहकार चळवळ सांभाळण्यासाठी अत्यंत सक्षम माणसे आहेत. भविष्यातही तयार होतील.
मात्र इतिहासाकडे दुर्लक्ष करु नका. त्याचे भान वर्तमानात येणार नसेल तर नंतर काहीही होणार नाही.

राज ठाकरे (MNS Chief Raj Thckeray) म्हणाले, राजकीय स्वार्थासाठी मराठवाड्यात साखर कारखाने काढले जात आहेत.
तिथे पाणी लागत नाही, तरीही हे केले जाते. नॅशनल जिओग्राफिकच्या अहवालानुसार पुढील ४० ते ५० वर्षात
मराठवाडा वाळवंट होईल. हे पुढाऱ्यांना समजत नाही. जे मिळतेय ते ओरबाडा,
पुढच्या पिढीच्या घशात घाला असे चालले आहे. कुणीही पुढील विचार करत नाही.

सध्याच्या राजकारणावर राज ठाकरे म्हणाले, राजकारणावर आज आपआपसात भांडतो आहोत.
कुणी मराठा, कुणी कुणबी, कुणी ब्राह्मण हे काय चाललंय? हे सगळे चालवले जात आहे.
मराठी माणूस एकत्र राहू नये म्हणून बाहेरच्या लोकांचे प्रयत्न सुरु आहेत. पण लोकांना ते कळत नाही.
जे महाराष्ट्राचे चांगले आहे ते बाहेर काढा, बाहेर निघत नसेल तर उद्ध्वस्त करा असे धोरण राबवले जात आहे.

राज ठाकरे म्हणाले, जगात जेवढी युद्ध झाली त्यांचा इतिहास हा भूगोलाशिवाय पूर्ण होत नाही.
हा भूगोल म्हणजे जमीन हे लक्षात घ्या. कुठलेही युद्ध म्हणजे काय तर जमिनीचा ताबा घेणे.
जमिनीचा ताबा घेणे याला आपण इतिहास म्हणतो. महाराष्ट्र आज इतका बेसावध आहे.
पूर्वी लढाया तरी होत होत्या आता राजकीय दृष्ट्या इतक्या हळूहळू पद्धतीने जमिनी घेतल्या जात आहेत की पुढे काही अस्तित्व राहणार नाही.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sharad Mohol Murder Case | कुख्यात गँगस्टर शरद मोहोळचा गोळया झाडून खून करणार्‍यांच्या काही तासात गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या, आरोपींमध्ये 2 वकिलांचा समावेश (व्हिडीओ)

Pune Pimpri Chinchwad Crime News | कमकुवत दोर तुटल्याने सातव्या मजल्यावरुन पडून मजुराचा मृत्यू, ठेकेदारावर गुन्हा दाखल; वाकड मधील घटना

मुलगा होत नसल्याने विवाहितेचा छळ, महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; पतीला अटक, चाकण परिसरातील घटना

ACB Trap News | सरकारी अनुदानाच्या अनुकूल अहवालासाठी लाच घेणारे जाळ्यात; सीबीआयची कारवाई