Pune Pimpri Chinchwad Crime News | जागेच्या वादातून दोन सख्खे भाऊ भिडले, 70 वर्षाच्या भावाकडून 80 वर्षाच्या भावाला मारहाण; दिघी परिसरातील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | दोन गुंठे जागेच्या वादातून दोन सख्खे भाऊ एकमेकांना भिडले. 70 वर्षीय भावाने 80 वर्षाच्या मोठ्या भावाला लोखंडी पाईपने बेदम मारहाण (Beating) करुन गंभीर जखमी केले. हा प्रकार हवेली तालुक्यातील चऱ्होली बुद्रुक येथील चोविसावाडी येथे घडला आहे. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात (Dighi Police Station) एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत शिवाजी पांडुरंग काळे (वय-80 रा. ज्ञानाई निवास, काळेवाडी, चोविसावाडी, चऱ्होली बु.) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन अर्जून पांडुरंग काळे (वय-70 रा. काळे कॉलनी, चोविसावाडी, चऱ्होली बु.) याच्यावर आयपीसी 326, 323 सह महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांचे सख्खे भाऊ आहेत. फिर्यादी यांच्या पत्नीच्या नावावर चोविसावाडी येथे दोन गुंठे जागा आहे. आरोपी अर्जून याचा कामगार आरोपीच्या नावाचा बोर्ड लावत होता. त्यावेळी फिर्यादी यांनी ही जागा माझी असून तू इथे कशाला बोर्ड लावतो, अशी विचारणा केली. त्यावेळी कामगार आरोपी यांना बोलवण्यास गेला असता फिर्यादी यांनी जागेत लावलेला बोर्ड काढून टाकला. तेवढ्यात आरोपी अर्जून त्या ठिकाणी आला. त्याने ही जागा माझी असून बोर्ड का काढला असे म्हणत फिर्यादी शिवाजी यांना शिवीगाळ करुन मारहाण केली. तसेच बोर्डाच्या लोखंडी पाईपने मारहाण केली. यामध्ये फिर्य़ादी यांच्या डाव्या हाताचा पंजा फ्रॅक्चर होऊन गंभीर जखमी झाले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

घरफोडी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना महाळुंगे पोलिसांकडून अटक, एक किलो सोने जप्त

Sharad Mohol Murder Case | …तर शरद मोहोळचा ‘गेम’ झाला नसता, कटात सामील न झाल्याने पोळेकरकडून भूगावमध्ये एकावर गोळीबार

Dr Sanjeev Thakur | ललित पाटील प्रकरण : ससून रूग्णालयाचे तत्कालीन डीन डॉ. संजीव ठाकूर यांच्याविरुद्ध पोलिसांना पुरावे मिळाले, अटक होणार?

Eknath Shinde Group | शिंदे गटाच्या मंत्र्याचे वक्तव्य, ”ठाकरे गट पुन्हा फुटणार, १४ तारखेला काय होतंय पहा…”

Uddhav Thackeray | घराणेशाहीमुळे देशाचं नुकसान, पंतप्रधानांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, ”गद्दारांची घराणेशाही प्राणप्रिय…”

Sharad Mohol Murder Case | शरद मोहोळच्या खूनासाठी मदत करणाऱ्या आणखी तिघांना अटक

Pune: Constructor Ended His Life Following Moneylender’s Constant Harassment; Complaint Against Accused for Instigating Suicide