Pune Pimpri Chinchwad Crime News | जुन्या भांडणाच्या कारणावरुन दोघांवर धारदार शस्त्राने वार, दिघी परिसरातील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | भांडणाच्या कारणावरुन चार जणांच्या टोळक्याने दोन तरुणांवर धारदार शस्त्राने वार करुन गंभीर जखमी केल्याची घटना आळंदी मोशी रोडवरील (Alandi Moshi Road) जुना डुडुळगाव जकात नाका येथे घडली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.5) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. याप्रकरणी दिघी पोलिसांनी (PCPC Police) चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत अमोल विलास शिंगाडे (वय-19 रा. गायकवाड वस्ती, कुरुळी ता. खेड) याने दिघी पोलीस ठाण्यात (Dighi Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन गणेश चव्हाण, चैतन्य (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) यांच्यासह इतर दोन साथीदारांवर आयपीसी 326, 323, 504, 34 सह आर्म अॅक्ट (Arm Act) नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांच्यात गुरुवारी भांडण झाले होते.
याचा राग आरोपींच्या मनात होता. शुक्रवारी दुपारी फिर्यादी अमोल शिंगाडे आळंदी मोशी रोडवरील पीएमपीएमएल
कार्यशाळेच्या (PMPML Workshop) समोर मित्रासोबत थांबला होता.
गुरुवारी झालेल्या भांडणाच्या कारणावरुन आरोपींनी फिर्यादी व त्याचा मित्र नागेश जाधव यांना शिवीगाळ
करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच सोबत आणलेल्या धारदार शस्त्राने दोघांवर वार करुन गंभीर जखमी केले.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरेंची सध्याच्या राजकारणावर चौफेर फटकेबाजी! ”नेते लाचार, मिंधे, पैशासाठी वेडे झालेत”

पिंपरी : घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या व्यावसायिकावर FIR

MNS Chief Raj Thckeray | राज ठाकरेंचा महायुती सरकारवर हल्लाबोल, ”आत्ताचं सरकार म्हणजे सहकार चळवळ नाही, ती ‘सहारा’ चळवळ”

Sharad Mohol Murder Case | कुख्यात गँगस्टर शरद मोहोळचा गोळया झाडून खून करणार्‍यांच्या काही तासात गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या, आरोपींमध्ये 2 वकिलांचा समावेश (व्हिडीओ)