Pune Pimpri Chinchwad Crime News | भांडण सोडवल्याच्या रागातून तरुणाच्या गाडीची तोडफोड, परिसरात दहशत पसरवणाऱ्या 12 जणांवर FIR; रामनगर परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | रामनवमी निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात झालेले भांडण सोडवल्याच्या रागातून आठ ते दहा जणांच्या टोळक्याने तरुणाच्या गाडीची तोडफोड केली. तसेच दगडफेक करुन दहशत पसरवल्याचा प्रकार वारजे माळवाडी परिसरातील रामनगर येथील एकता सोसायटी सोमवारी (दि.22) रात्री अकराच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांनी दहा जणांवर गुन्हा दाखल केला. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत सौरभ ज्ञानोबा चौधरी (वय-24 रा. एकता सोसायटी, मातोश्री निवासासमोर, रामनगर, वारजे माळवाडी, पुणे) याने वारजे पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police Station) फिर्याद दिली. यावरुन वैभव गावडी, प्रकाश राठोड, महादेव झाडे, साहिल शेख यांच्यासह आठ ते दहा अनोळखी व्यक्तींवर आयपीसी 323, 504, 506, 143, 147, 149, 336, 427, 34 सह क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्याद आणि आरोपी वैभव गावडी हे एकमेकांचे मित्र आहेत. सौरभ चौधरी याने सोमवारी रामनवमीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी त्याने वैभव गावडी याला बोलावले होते. त्यामुळे गावडी हा त्याच्या इतर साथीदारांसह कार्यक्रमाच्या ठिकाणी आला. त्याने फिर्यादी यांचा मित्र निरंजन माळी याला काहीही कारण नसताना हाताने मारहाण केली. तर गावडी याच्या इतर सहकाऱ्यांनी शिवीगाळ केली.

त्यावेळी फिर्यादी व त्याचा मित्र अभिषेक डोंगरदिवे हे वाद सोडवण्यासाठी गेले.
त्यावेळी आरोपी वैभव याने फिर्यादी यांना आमच्या भांडणात पडु नका नाहीतर तुम्हाला सोडणार नाही अशी धमकी दिली.
सौरभ चौधरी याने भांडण सोडवल्याचा राग आरोपीच्या मनात होता.
रात्री अकराच्या सुमारास सौरभ हा त्याच्या मित्रांना भेटण्यासाठी गेला होता.
त्यावेळी आरोपींनी सौरभच्या घरासमोर पार्क केलेल्या चारचाकी गाडीची तोडफोड करुन दगडफेक केली.
यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शिंदे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

संपूर्ण राज्यात हुडहुडी; पुण्यात हंगामातील सर्वात कमी किमान तापमानाची नोंद

हडपसर परिसरात दोन टोळक्यामध्ये राडा, सराईत गुन्हेगारासह 6 जणांना अटक

पुणे : बदनामी करण्याची धमकी देऊन शारीरिक संबंधाची मागणी, मित्रावर गुन्हा दाखल

कर्तव्य बजावत असताना पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण, एकाला अटक; लष्कर परिसरातील घटना

चुलत्याकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, पुण्यातील धक्कादायक घटना

मौजमजेसाठी रिक्षा चोरणारा भारती विद्यापीठ पोलिसांकडून गजाआड, दोन रिक्षा जप्त

लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, लग्नास नकार देणाऱ्या तरुणाला समर्थ पोलिसांकडून अटक

Pavitra Portal | स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांची भरती, पवित्र पोर्टलवरील जाहिरात प्रक्रिया मुदतीत पूर्ण करा

बहिणीबाबत विचारणा केल्याने नातेवाईक तरुणांना मारहाण, महाळुंगे परिसरातील प्रकार

Pune News | फिल्म अ‍ॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये (FTII) ‘बाबरी’ वरुन राडा, हिंदुत्ववादी संघटना आक्रमक (Video)