Pune Pimpri Chinchwad Crime News | जुन्या भांडणाच्या रागातून महिलेला मारहाण, महिलेसह तिघांना अटक; निगडी येथील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | काही दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून तिन जणांनी एका महिलेला शिवीगाळ करुन मारहाण केली. तसेच हातातील लोखंडी पंच डोक्यात मारुन गंभीर जखमी केल्याची घटना निगडी येथे घडली आहे. याप्रकरणी निगडी पोलिसांनी एका महिलेसह तिघांना अटक केली आहे. हा प्रकार बुधवारी (दि.24) रात्री साडे नऊच्या सुमारास ओटास्किम निगडी येथे घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत एका महिलेने निगडी पोलीस ठाण्यात (Nigdi Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन विकास उर्फ सोन्या कमलाकर म्हस्के (वय-21), प्रकाश उर्फ पक्या कमलाकर म्हस्के (वय-20 दोघे रा. पंचशिल हौसिंग सोसायटी, ओटास्किम, निगडी) यांच्यावर आयपीसी 324, 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी व त्यांचे घरातील सदस्य खडकी येथील टपरीवर असताना आरोपी महिलेसोबत
15 जानेवारी रोजी भांडण झाले होते. याचा राग आरोपींच्या मनात होता. याच कारणावरुन आरोपींनी फिर्यादी यांच्या
घरी येऊन त्यांना शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. तर आरोपी प्रकाश याने त्याच्या हातातील लोखंडी पंच
फिर्यादी यांच्या डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. यावेळी फिर्यादी यांचा मुलगा भांडण सोडवण्यासाठी आला
असता आरोपींनी त्याला मारून टाकण्याची धमकी दिली. पुढील तपास निगडी पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

मंदिरात दान करण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाला लुटले, धायरी येथील प्रकार

Pune Congress News | काँग्रेसने केले आशानगर पाण्याच्या टाकीचे उदघाटन; लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, श्रेय घेण्याचा प्रयत्न भाजपच्या अंगलट – माजी नगरसेवक दत्ता बहिरट

Manoj Jarange Patil | जरांगे यांनी सरकारकडे केल्या ‘या’ मागण्या, तोपर्यंत सर्व शिक्षण मोफत करा, सरकारने रात्रीपर्यंत…

Deepak Kesarkar | जरांगेंच्या आंदोलनावर तोडगा निघाला?, मंत्री केसरकरांनी केले मोठे वक्तव्य