Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : दारुसाठी पैसे देण्यास नकार, लहान भावाकडून मोठ्या भावाला रॉडने मारहाण

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime | दारु पिण्यास हजार रुपये देण्यास नकार दिल्याने लहान भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारुन गंभीर जखमी केले. हा प्रकार गुरुवार (दि.22) सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास खेड तालुक्यातील (Khed Taluka) आळंदी (Alandi) येथील फुलाच्या दुकानावर घडली आहे. याप्रकरणी आळंदी पोलिसांनी (Alandi Police Station) लहान भावावर खुनाचा प्रयत्न केल्याचा (Attempt To Murder) गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत महेश विष्णु देवकाते (वय-33 रा. हनुमानवाडी, केळगाव, ता. खेड) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी महादेव विष्णू देवकाते (वय-26 रा. मौजे चऱ्होली खुर्द, ता. खेड) याच्यावर आयपीसी 307, 504, 506 सह क्रिमीनिल लॉ अमेंन्डमेंट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.(Pune Pimpri Chinchwad Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महेश देवकाते हे आळंदी गावच्या हद्दीतील संदिप कायस्थ यांच्या फुलांच्या दुकानावर काम करीत होते.
गुरुवारी सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांचा लहान भाऊ महादेव हा दुकानात आला.
त्याने फिर्यादी यांच्याकडे दारु पिण्यासाठी एक हजार रुपये मागितले. मात्र, महेश याने पैसे देण्यास नकार दिला.
याचा राग आल्याने त्याच्या जवळील लोखंडी रॉड महेश याच्या डोक्यात मारुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच आळंदी माऊली मंदिर परिसरातील सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करुन लोकांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण केले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक साळी करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या विविध योजनांच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Pune Police MCOCA Action | माथाडी बोर्डाचे नेते असल्याचे सांगून खंडणी मागणाऱ्या टोळीवर ‘मोक्का’

येरवडा येथे साकारणार शिवगर्जना महानाट्य ! छत्रपती शिवाजी महाराज यांचा धगधगता इतिहास मांडणार, 24 ते 26 फेब्रुवारीला आयोजन