Pune Pimpri Chinchwad Crime | शाळेजवळ असलेल्या स्पा सेंटरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, 5 मुलींची सुटका; पिंपळे सौदागर मधील प्रकार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime | दवाखाना आणि शाळेजवळ असलेल्या एका स्पा सेंटरमध्ये (Spa Center) पोलिसांनी छापा टाकून वेश्याव्यवसायाचा (Prostitution) पर्दाफाश केला आहे. ही कारवाई (Pune Pimpri Chinchwad Crime) बुधवारी (दि.15) सायंकाळी सातच्या सुमारास पिंपळे सौदागर मधील काटे वस्ती येथील एज लाईन टच द ब्युटी (Age Line Touch the Beauty) नावाच्या स्पा सेंटरमध्ये करण्यात आली. या कारवाईत पाच मुलींची सुटका करुन मॅनेजरला अटक केली आहे.

 

स्पा मॅनेजर शाकीर समीरउद्दीन अहमद (वय-26 सध्या रा. स्पा मध्ये मुळ रा. होजाई राज्य आसाम) याला अटक केली आहे.
तर पांडे चंकी धमेंद्र (वय-22 रा. पाचपीर चौक, काळेवाडी), मंगेश भगवान जाधव (वय-35 रा. हिंजवडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत महिला पोलीस हवालदार सुधा अशोक टोके (वय-43) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात (Sangvi Police Station) फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे काटे वस्ती येथे आसपास दवाखाने, शाळा असा रहिवासी परिसर असताना याठिकाणी बेकायदेशीर स्पा च्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवत होते.
याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी पाळत ठेऊन स्पा सेंटरवर छापा टाकून पाच पीडित मुलींची सुटका केली.
तर स्पा च्या मॅनेजरला अटक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे सुनिल तांबे (Police Inspector Sunil Tambe) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Pimpri Chinchwad Crime | Sex racket busted in spa center near school, 5 girls rescued; Type in Pimple Saudagar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ravindra Jadeja | जडेजाने कसोटीत रचला विक्रम; अशी कामगिरी करणारा ठरला भारताचा पहिला तर जगातील दुसरा खेळाडू

Pravin Darekar | शरद पवारांच्या टीकेला प्रवीण दरेकारांचे प्रत्युत्तर, म्हणाले- ‘पवारांच्या बोलण्यावर देवेंद्र फडणवीसांचे महत्त्व…’

Governor Bhagat Singh Koshyari | राष्ट्रवादीने प्रसिद्ध केले राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचे ‘अधोगती पुस्तक’, दिला ‘हा’ शेरा