Pune Pimpri Chinchwad Fire News | पुण्यात टँकरला लागलेल्या भीषण आगीनंतर हवेत मोठे स्फोट, चार स्कूल बस जळाल्या, भीतीमुळे लोकांमध्ये घबराट

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Fire News | एका गॅस टँकरला (Gas Tanker) भीषण आग लागल्याची घटना पिंपरी-चिंचवडमधील ताथवडे (Tathwade) येथील जेएसपीएम महाविद्यालयाजवळ (JSPM College) घडली आहे. आगीनंतर मोठे स्फोट होऊन हवेत आगीचे लोट पसरू लागल्याने लोकांची पळापळ सुरू झाली. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण समजलेले नाही. आगीत तीन ते चार स्कूल बस जळून खाक झाल्या आहेत. ही घटना रविवारी (दि.8) रात्री साडेअकरा ते पावणे बाराच्या सुमारास ताथवडे मधील जेएसपीएम महाविद्यालयाजवळ घडली. (Pune Pimpri Chinchwad Fire News)

पिंपरी, थेरगाव, प्राधिकरण, राहटणी, चिखली, भोसरी, तळवडे, हिंजवडी, एमआयडीसी आणि पीएमआरडीए येथील बंब घटनास्थळी दाखल झाले होते. अग्निशमन दलाने (Fire Brigade) आग आटोक्यात आणली. रात्री उशीरा कुलिंग ऑपरेशन सुरू झाले होते. या गॅस टँकरमधून सिलिंडरमध्ये गॅस अवैधरित्या भरताना स्फोट झाला, अशी प्राथमिक माहिती आहे. (Pune Pimpri Chinchwad Fire News)

परिसरात स्फोटांचे आवाज येऊ लागल्याने नागरिकांची पळापळ झाली, तसेच भीतीचे वातावरण पसरले होते.
अग्निशमन दलाच्या आठ ते दहा गाड्या आणि जवान घटनास्थळी पोहचल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. यानंतर आगीवर अर्धा ते पाऊण तासात नियंत्रण मिळवण्यात यश आले. दरम्यान, या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले.

जिथे घटना घडली त्याच्या बाजूला असणारी सोसायटी हादरली. स्फोटामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली होती.
रस्त्यावर मोठी गर्दी झाली होती.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

9 October Rashifal : शुभयोगात मेष, वृषभ सह या 5 राशींना होईल लाभ, वाचा दैनिक भविष्य