Pune Pimpri Crime | शेतकऱ्याची वडिलोपार्जित जमीन हडपण्याचा प्रयत्न, 4 जणांवर गुन्हा दाखल

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | शेतकऱ्याची वडिलोपार्जित जमीन चार जणांनी बनावट सही करुन खरेदी पावती करत बळकावण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात जाब विचारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला जातीवाचक शिवीगाळ (Abusive) करण्यात आली. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या (Talegaon Dabhade Police Station) शिरगाव पोलीस चौकीत (Shirgaon Police Chowki) चार जणांवर IPC 420, 467, 468, 471, 504, 506, 34 सह अनुसुचित जाती व जमाती अत्याचार कायद्यांतर्गत (Atrocity Act) गुन्हा (FIR) दाखल करण्यात (Pune Pimpri Crime) आला आहे.

 

याप्रकरणी लिंबाजी रामभाऊ गायकवाड Limbaji Rambhau Gaikwad (वय – 56 रा. शिरगाव, ता. मावळ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी उस्मान दगडू शेख Usman Dagdu Sheikh (रा. शिरगाव), समीर शीरील मुनतोंडे Sameer Shiril Muntonde (रा. वडगाव शेरी), अशोक लक्ष्मण कांबळे Ashok Laxman Kamble (रा. कांबरे, ता. मावळ), जहांगीर राजु डांगे Jahangir Raju Dange (रा. शिरगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरगाव येथील गट नंबर 197 यापैकी 50 आर ही फिर्यादी यांची वडिलोपार्जित जमीन आहे. त्या जमिनीबाबत विचारपूस करण्यासाठी फिर्यादी हे आरोपी उस्मानच्या घरी गेले. त्यावेळी उस्मान याने फिर्यादी यांना ‘जमिनीबाबत काय विचारतो, ती जमीन माझी आहे’, असे म्हणून जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) देऊन जातीवाचक शिवीगाळ केली.

 

आरोपी उस्मान याने ‘माझा मुलगा पोलीस पाटील आहे.
पोलिसात तक्रार दिली तर तुला या गावातून गायब करुन जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी देऊन जातीवाचक शिवीगाळ केली.
दरम्यान 2 फेब्रुवारी 2022 पूर्वी आरोपींनी या जमिनीचे बनावट खरेदी पावती (Fake Purchase Receipt) करुन त्यामध्ये फिर्यादी यांच्या नावाची बनावट सही केली.
फिर्यादी यांची वडिलोपार्जित जमीन हडपण्याचा प्रयत्न केला.
तसेच न्यायालयास (Court) फसवण्याचा (Cheating) उद्देशाने खोटी खरेदी पावती करुन जमीन हडपण्याचा प्रयत्न केला.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. एस. कांबळे (PSI S. S. Kamble) करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Pimpri Crime | Attempt to grab farmers ancestral land FIR against 4 in Talegaon Dabhade Police Station

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा