Pune Pimpri Crime | OLX वर कार घेणं पडलं महागात, युवकाची साडेचार लाखाची फसवणूक; सांगवी परिसरातील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | OLX साईटवरुन कार घेणं एका 32 वर्षीय युवकाला चांगलेच महागात पडले आहे. आरोपीने कार देण्याच्या बदल्यात 4 लाख 50 हजार रुपये ऑनलाईन घेऊन कार न देता फसवणूक (Fraud) केली. हा प्रकार (Pune Pimpri Crime) 19 मे 2022 ते 30 मे 2022 या कालावधीत जुनी सांगवी (Old Sangvi) येथील शितोळेनगर येथे घडला आहे.

याबाबत कुणाल वसंत बऱ्हाटे Kunal Vasant Barhate (वय-32 रा. साई चौक, नवी सांगवी) यांनी रविवारी (दि.8) सांगवी पोलीस ठाण्यात (Sangvi Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सनी सुनिल दाते Sunny Sunil Date (रा. फ्लॅट नं. 624, मृणाल क्लासीक, सुसगाव, पुणे) याच्यावर आयपीसी 420 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Pimpri Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने ओ.एल.एक्स. साईटवर मारुती कंपनीची ब्रिझा गाडी Maruti Suzuki Brezza (एमएच 12 पीएच 5554) विक्री करण्याची जाहिरात टाकली.
फिर्य़ादी कुणाल यांनी गाडी खरेदी करण्याची तयारी दर्शवल्यानंतर आरोपीने शितोळे नगर येथे प्रत्यक्षात गाडी दाखवली.
यानंतर फिर्यादी यांनी आरोपीकडून 6 लाख 70 हजार रुपयांना गाडी खरेदी केली.
गाडीच्या ठरलेल्या किमतीपैकी 4 लाख 50 हजार रुपये फिर्यादी यांनी आरोपीला ऑनलाईन दिले.
त्यानंतर उर्वरित दोन लाख 20 हजार रुपये फिर्यादी देत असतानाही आरोपी सनी दाते याने गाडी दिली नाही.
कुणाल बऱ्हाटे यांनी सनी दाते याला वारंवार फोन केला मात्र त्याने फोन उचलला नाही.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कुणाल यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली.
पुढील तपास सांगवी पोलीस करीत आहेत.

Web Title :-  Pune Pimpri Crime | Had to buy car on OLX expensive, young man cheated of Rs 4.5 lakh; The incident took place in Sangvi premises

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Cabinet Expansion | ‘मंत्रिमंडळ विस्तार करण्याचं धाडस मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये नाही’ – काँग्रेस

Sanjay Raut | शिंदे सरकारच्या भवितव्याबद्दल संजय राऊतांचे मोठे विधान; म्हणाले, ‘हे तर…’

Jitendra Awhad | कायद्याचा दुरूपयोग झाल्यास कायदा हाती घेणार – जितेंद्र आव्हाड.