Pune Pimpri Crime News | भावाच्या मित्राकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार; पुण्यातील धक्कादायक प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime News | भावाच्या मित्राने अल्पवयीन मुलीसोबत ओळख वाढवून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. हे प्रकरण इतके पुढे गेले की आरोपीने मुलीसोबत शारीरिक संबंध (Pune Minor Girl Rape Case) ठेवले. ती गरोदर (Pregnant) राहिल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. याबाबत पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Pune Police) पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप आरोपीला अटक केली नाही. (Pune Pimpri Crime News)

याबाबत 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने रविवारी (दि.3) भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन गणेश उर्फ दिपक जाधव (रा. कात्रजगाव, पुणे) याच्यावर आयपीसी 376/2/एन, पोक्सो कलम (POCSO Act) 3 व 4 नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जुलै 2023 ते नोव्हेंबर 2023 या कालावधीत आरोपीच्या घरी घडला आहे. (Pune Pimpri Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पीडित अल्पवयीन मुलीच्या भावाचा मित्र आहे. आरोपीने मुलीसोबत ओळख करुन
तिला वेळोवेळी फोन केला. तसेच तुला सुखात ठेवीन असे सांगून मुलीला त्याच्या घरी बोलावून घेतले.
यानंतर आरोपीने मुलीच्या इच्छे विरुद्ध तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
यातून मुलगी चार महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार घरच्यांसमोर आला.
यानंतर कुटुंबियांनी पीडितेला विश्वासात घेऊन माहिती घेतली असता तिने सगळा प्रकार घरच्यांना सांगिता.

पीडित मुलीच्या कुटुंबियांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपी विरोधात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक घोगरे (PSI Ghogre) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

दारु पिण्याच्या पैशावरून तरुणाचा खून, पुरंदर तालुक्यातील घटना


पुण्यात मराठी पाट्यांसाठी आंदोलन, मनसेच्या पदाधिकारी व कार्य़कर्त्यांवर डेक्कन, विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

महिलेचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवला, ब्लॅकमेल करत केला बलात्कार; लष्करातील जवानावर FIR

नवले पुलाजावळ पुन्हा अपघात, कंटेनरची पाच वाहनांना धडक; चार जखमी (Video)

मौजमजेसाठी चोरीच्या दुचाकी विक्री करणारे एजंट कोंढवा पोलिसांकडून गजाआड, 15 दुचाकी जप्त

सार्वजनिक ठिकाणी राडारोडा टाकणार्‍या जेम्स व्हिल शापुरजी हौसिंग प्रा.लि. कंपनीला एक लाख रुपयांचा दंड