Pune Pimpri Crime News | पिंपरी : साई चौकातील अवैद्य हुक्का बारवर पोलिसांचा छापा, 1 लाखाचा मुद्देमाल जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime News | पिंपरी येथील साई चौकातील रोनक बार अँन्ड रेस्टॉरंट (Raunak Bar & Restaurant) मध्ये बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या हुक्का बारवर (Illegal Hookah Bar) पिंपरी पोलिसांनी (Pimpri Police) छापा टाकून एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर हॉटेल मालकासह मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (दि.25) रात्री साडेबाराच्या सुमारास करण्यात आली. (Pune Pimpri Crime News)

याप्रकरणी रोनक बार अँन्ड रेस्टॉरंटचा मालक विक्रम परशुराम बख्तियारपुर Vikram Parashuram Bakhtiarpur (वय 35, रा. वैभवनगर, पिंपरी), हॉटेल मॅनेजर संजय हमेलाल छेत्री Hotel Manager Sanjay Hamelal Chhetri (वय 29, रा. साई चौक, पिंपरी) यांच्यावर सिगारेट व इतर तंबाखु उत्पादने अधिनियम सन 2003 चे कलम 4,7,21 व सुधारणा अधिनियम 2018 चे कलम 4(अ), 21(अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस हवालदार अभिजीत बाळु कुंभार यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Pimpri Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी येथील साई चौकात असलेल्या रोनक बार अँन्ड रेस्टॉरंट येथे अवैध हुक्का पार्लर (Illegal Hookah Parlor) चालु आहे, अशी माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी
रात्री साडेबाराच्या सुमारास याठिकाणी छापा टाकला. यावेळी हॉटेलची पाहणी केली असता, हॉटेल मालक व हॉटेल मॅनेजर
हे हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांना मद्य व तंबाखुजन्य हुक्का पदार्थ पुरवुन, हुक्का बार चालवताना आढळून आले.
या कारवाईत 1 लाख 8 हजार रुपये किमतीचे हक्का फ्लेवर डबे इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

दुचाकीला धडक देऊन तरुणावर खुनी हल्ला, आळंदी येथील घटना

तळेगाव दाभाडे : नातवंडांना भेटण्यासाठी भावाने मागितली बहिणीकडे दीड कोटींची खंडणी