Pune Pimpri Crime News | दुचाकीला धडक देऊन तरुणावर खुनी हल्ला, आळंदी येथील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime News | दुचाकीवरुन जाणाऱ्या तरुणाला अनोळखी व्यक्तीने त्याच्या दुचाकीला धडक दिली. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणाला त्या व्यक्तीने लाकडी दांडक्याने व दगडाने बेदम मारहाण (Beating) करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) केला. ही घटना शुक्रवारी (दि. 24) सायंकाळी साडेसहा वाजता काळेवाडी झोडपट्टीजवळ देहूफाटा आळंदी येथे घडली. (Pune Pimpri Crime News)

याबाबत महेश संजय चौधर (वय-30 रा. सिल्वर नाईन सोसायटी, मोशी, पुणे) यांनी दिघी पोलीस ठाण्यात (Dighi Police Station) फिर्य़ाद दिली आहे. यावरुन पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध आयपीसी 307, 504 सह महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी व त्यांचे मित्र राजकुमार शिरसाट हे दुचाकीवरुन (एमएच 14 के.वाय 5241) आळंदीकडे जात होते. काळेवाडी झोपडपट्टीजवळ ते आले असता पाठीमागून आलेल्या अज्ञात दुचाकीने फिर्यादी यांच्या दुचाकीला धक्का दिल्याचे जाणवले. धक्का देणाऱ्या अज्ञात व्यक्तीकडे याबाबत विचारले असता त्याने हातातील लाकडी दांडक्याने व दगडाने फिर्यादी यांना मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये त्यांच्या पायाला गंभीर इजा झाली आहे. त्यानंतर आरोपीने परिसरात दहशत निर्माण केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आर.बी. भंडारे (PSI R.B. Bhandare) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

तळेगाव दाभाडे : नातवंडांना भेटण्यासाठी भावाने मागितली बहिणीकडे दीड कोटींची खंडणी

आयशर टेम्पोची दुचाकीला धडक, 11 वर्षाच्या मुलाचा मृत्यू; चाकण मधील घटना

पुणे : चोरट्यांकडून बंद घरे टार्गेट; तीन घरफोड्यांमध्ये 15 तोळे सोन्याचे दागिन, 105 ग्रॅम चांदी अन् रोकड लंपास

मुंबई 26/11 दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना पुणे शहर पोलिसांकडून मानवंदना

पुणे : पोलिसांत तक्रार दिल्याच्या रागातून जीवे मारण्याची धमकी, परिसरात दहशत माजवल्या प्रकरणी FIR