Pune Pimpri Crime | ‘मी मन्या घोडके पिंपरी चिंचवडचा भाई’ असे म्हणत तरुणावर कोयत्याने वार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | दारु पिऊन मोठ्या आवाजात शिवीगाळ करणाऱ्या टोळक्याकडे बघीतल्याच्या रागातून एका तरुणावर कोयत्याने वार केले. तसेच ‘मी मन्या घोडके पिंपरी चिंचवडचा भाई आहे, एक एकाला जीवंत सोडणार नाही’ अशी धमकी (Threat) देत इतर तिघांना मारहाण (Beating) केली. याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा (FIR) दाखल करुन एकाला अटक (Arrest) करण्यात आली आहे. हा प्रकार (Pune Pimpri Crime) मंगळवारी (दि.6) रात्री नऊ ते साडे दहाच्या दरम्यान काळेवाडी येथील जिवन चौकात घडला.

मन्या उर्फ प्रतिक संजय घोडके Manya alias Pratik Sanjay Ghodke (वय-22 रा. काळेवाडी) याच्यासह इतर तीन जणांवर आयपीसी 308, 324, 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल करुन मन्या घोडकेला अटक केली आहे. याबाबत अश्विन राहुल सिंग Ashwin Rahul Singh (वय-17 रा. नडेनगर, काळेवाडी) याने बुधवारी (दि.7) वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Pimpri Crime)

वाकड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्याचे मित्र कुणाल चौधरी, तेजस वराडे व अनुज गोड गप्पा मारत जिवन चौकातून पायी चालत जात होते. त्यावेळी आरोपी दारु पिऊन मोठ्या आवाजात शिव्यात देत होते. फिर्यादीने त्यांच्याकडे पाहिल्याने त्याचा राग आल्याने आरोपींनी फिर्यादीला मारहाण करु रस्त्यावर पाडले. आरोपी मन्या उर्फ प्रतीक घोडके याने त्याच्याकडे असलेल्या कोयत्याने अश्वीन सिंग याच्या डोक्याच्या मागे कोयत्याने वार केला. तसेच ‘मी मन्या घोडके पिंपरी चिंचवडचा (Pimpri Chinchwad) भाई काळेवाडी मध्ये राहायचे असेल तर ईज्जतीत रहायचे, नाहीतर मी एक एकाला जिवंत सोडणार नाही’ असे म्हणत हातातील कोयता हवेत फिरवून परिसरात दहशत माजवली. तर आरोपी मन्या घोडकेच्या इतर साथीदारांनी फिर्यादी यांच्या मित्रांना हाताने मारहाण केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण (PSI Chavan) करीत आहेत.

Web Title :- Pune Pimpri Crime | Saying ‘I manya ghodke Pimpri Chinchwadcha Bhai’, stab the young man with a spear

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Accident News | चांदणी चौकात भरधाव वाहनाच्या धडकेत सेल्स एक्झिक्युटिव्हचा मृत्यु

Ration Card धारकांसाठी मोठी बातमी, या लोकांना मिळणार नाही रेशन, कार्ड सुद्धा होईल रद्द!

Pune Ganeshotsav 2022 | गणेश विसर्जनासाठी यंदा धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन नाही – जलसंपदा विभागाची स्पष्टोक्ती

Mutual Fund | 5 स्टार रेटिंगच्या 5 दमदार स्कीम; रू. 10,000 मंथली SIP ने 3 वर्षात झाला 7.29 लाखापर्यंत फंड, जाणून घ्या रिटर्न