Pune PMC Anti-Encroachment Drive | साई चौक, जयकर पथ येथील 44 अतिक्रमणांवर पुणे महापालिकेची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC Anti-Encroachment Drive | साई चौक, जयकर पथ येथील अतिक्रमणावर महापालिकेची कारवाई केली आहे. हा भाग खडकी कॅन्टोन्मेंट व पुणे मनपा हद्दीवर येत असून कॅन्टोन्मेंट हद्दीत येतो. खडकी रेल्वे स्टेशन मागील बाजूस असलेल्या चौकाचा औंध, बोपोडी हद्दीतील नागरिक मोठ्या प्रमाणात वापर करतात. या चौकामध्ये सुमारे 44 स्टॉल धारकांनी मागील अनेक वर्षापासून अतिक्रमण केले आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. (Pune PMC Anti-Encroachment Drive )

वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांनी पुणे जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रारी केल्या होत्या. त्याबाबत खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड व पुणे मनपा यांनी संयुक्त कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. खडकी कॅन्टोन्मेंट मुख्याधिकारी यांनी पुणे मनपाकडे अतिक्रमण कारवाई व रस्ता दुरूस्तीसाठी मदत मागितली. महापालिका आयुक्त यांनी आवश्यक सहकार्य करणेचे मान्य केले. त्यानुसार शुक्रवारी (दि12) संयुक्त कारवाई करण्यात आली.

या कारवाईत सर्व 44 स्टॉल काढून टाकण्यात आले. त्यामुळे साई चौक मोकळा झाला.
शुक्रवारी रात्री त्याचे डांबरीकरण केले जाणार आहे. ज्यादा उपलब्ध रस्त्याचे तातडीने रूंदीकरण करणेत येणार आहे.
सध्या उपलब्ध 12 मी रुंदीचा रस्ता सुमारे 24 मी पर्यंत रुंदीचा उपलब्ध होणार आहे.
त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

ही कारवाई अतिरिक्त महापालिका आयुक्त ढाकणे व मुख्याधिकारी, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड रॉबिन बलेचा यांचे
नियंत्रणाखाली मुख्य अभियंता पावसकर, अधीक्षक अभियंता साहेबराव दांडगे, कार्यकारी अभियंता दिनकर गोजारे,
उपायुक्त वारुळे, महा.सहा आयुक्त, औंध क्षेत्रिय कार्यालय दापेकर यांनी केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Srinivas Patils Wife Rajni Devi Passes Away | खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी रजनीदेवी यांचे निधन

PM Narendra Modi In Maharashtra | PM मोदींचा आज झंझावाती महाराष्ट्र दौरा, नाशिकमध्ये रोड शो, नवी मुंबईत अनेक कामांचे उद्घाटन

Ajit Pawar On Katraj Dairy Playgrounds Reservation | कात्रज डेअरी मैदान आरक्षण उठवण्याबद्दल माहिती घेऊन सांगतो – उपमुख्यमंत्री अजित पवार

PM Narendra Modi in Maharashtra | मोदींचा तरुणांना सल्ला, ”तुमच्या पॉलिटिकल व्हुयजपेक्षा तुमचं मतदान जास्त महत्त्वाचं”, घराणेशाहीवर केला हल्लाबोल!

सोन्याच्या दुकानात दरोडा घालणाऱ्या कामगारासह इतर आरोपींना फरासखाना पोलिसांनी ठोकल्या बेड्या, ३ किलो ४८० ग्रॅम सोने व रोख रक्कम जप्त