Pune PMC Employees | निवृत्त होतानाच कर्मचार्‍यांना पीएफ, शिल्लक रजेचे पैेसे आणि लगेचच पेन्शन सुरू करण्यासाठी स्वतंत्र सेल स्थापन करणार: महापालिका आयुक्त विक्रम कुमार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC Employees | महापालिकेतून निवृत्त झालेल्या कर्मचार्‍यांना पेन्शन आदी देणी मिळविण्यासाठी पायर्‍या झिजवाव्या लागत आहे. यातून त्यांची सुटका करण्यासाठी आता एक स्वतंत्र सेल निर्माण करण्यात येईल असे आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांनी स्पष्ट केले आहे. (Pune PMC Employees)

 

महापालिकेत अनेक वर्ष सेवा बजाविल्यानंतर निवृत्त झालेल्या कर्मचार्‍यांना पेन्शन आणि इतर लाभ मिळविण्यासाठी कागदोपत्रांची पुर्तता आदी सोपस्कार पार पाडावे लागत आहे. परंतु हे सोपस्कार पार पाडण्यासाठी महापालिकेच्याच प्रशासनाकडून त्यांची दमछाक केली जात आहे. गेल्या आठवड्यात पेन्शन विभागातील एका कर्मचार्‍याला पेन्शन साठी एका निवृत्त कर्मचार्‍याकडून लाच स्विकारल्याच्या आरोपात अटक झाली आहे. यामुळे निवृत्त कर्मचार्‍यांचा हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. (Pune PMC Employees)

कर्मचारी ज्या महीन्यात निवृत्त होतो, त्याच महीन्यात भविष्य निर्वाह निधी,
थकीत रजेचे पैसे मिळाले पाहीजे. तर दुसर्‍या महीन्यापासून त्याला पेन्शनची रक्कम मिळण्यास सुरुवात झाली पाहीजे.
कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर प्रशासकीय कामांना सुरुवात केली जाते.
संबंधित कर्मचारी सेवेत कधी रुजु झाला, सेवा काळात त्याला मिळालेली पदोन्नती,
त्याची सेवा पुस्तिका तपासणी आदी कामे करावी लागतात. एखाद्या प्रकरणात त्रुट निघाली तर त्याची पुर्तता करण्यात वेळ जातो. यातुन मार्ग काढण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून आता स्वतंत्र पेन्शन सेल सुरु केला जाणार आहे.

 

Web Title : Pune PMC Employees | Separate cell to start PF, balance leave pay and pension to
employees on retirement: Municipal Commissioner Vikram Kumar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा