Maharashtra Politics News | शिवसेनेच्या बड्या नेत्याची शरद पवारांना भेटण्यासाठी धरडप, पण…; अमोल कोल्हेंचा मोठा दावा (व्हिडिओ)

शिरूर : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | राज्यातील सत्तांतरानंतर शिरुर लोकसभेच्या आजी-माजी खासदारांनी एकमेकांवर चांगलीच चिखलफेक सुरु झाली आहे. अभिनयातून वेगवेगळी पात्र आणि भूमिका बदलणारे कोल्हे जनतेच्या मनातून उतरले असल्याचा टोला शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shiv Sena former MP Shivajirao Adharao Patil) यांनी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (NCP MP Amol Kolhe) यांना लगावला होता. यावर अमोल कोल्हे यांनी पलटवार केला आहे. अमोल कोल्हे यांनी ट्विटरवर त्यांच्या यु-टूयुबची लिंक शेअर केली आहे. (Maharashtra Politics News)

 

शिरुर लोकसभा मतदारसंघाचे (Shirur Lok Sabha Constituency) माजी खासदार आणि शिंदे गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्या संपर्कात असल्याचा दावा अमोल कोल्हे यांनी केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिरुर लोकसभा मतदारसंघात एकच खळबळ उडाली आहे. आढळराव पाटील दार ठोठावत असले तरी त्याच्या किल्ल्या मात्र माझ्याकडे असल्याचे कोल्हे यांनी सांगितले. (Maharashtra Politics News)

आढळराव पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना अमोल कोल्हे यांनी हा दावा केला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी तुम्हाला चार वेळा मतदारसंघातून लढण्याची संधी दिली. तरीही त्यांच्या संकटाच्या काळात तुम्ही त्यांना सोडून गेलात. शरद पवार साहेबांनी मला एकदाच तिकीट दिलं आणि आज त्यांच्यावर संकट आहे आणि मी त्यांच्या सोबत आहे. हा आपल्या दोघांमधला फरक असल्याचे म्हणत कोल्हे यांनी आढळरावांवर पलटवार केला आहे. आढळराव पाटील बोलतात एक आणि करतात एक असाही आरोप कोल्हे यांनी केला आहे.

अभिनयावर केलेल्या टीकेला उत्तर देताना अमोल कोल्हे म्हणाले की, अभिनय हा माझ्या चरितार्थाचे साधन आहे. माझी अमेरिकेत कुठलीही कंपनी नाही आणि तसा मी माझ्या अभिनयातून कोणताही फायदा करुन घेतला नाही. आमचे छंद चार चौघात उथळमाथ्याने सांगतोय तसं तुमचे छंद काय? असा अडचणीचा प्रश्न विचारुन आपल्या सारख्या वयस्कर व्यक्तीची गोची करु इच्छित नाही, असे अमोल कोल्हे म्हणाले.

शिरुर मतदार संघात होत असलेल्या विकास कामाचे श्रेय आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न नेहमी प्रमाणे केलात. हे इतकं शक्य होतं तर 15 वर्षात करायला पाहिजे होतं. यावर आपण तारीख, वार, पुरावे या सगळ्यांनुसार बोलू. पण त्यासाठी आधी लोकसभेची उमेदवारी तर जाहीर होऊ द्या. कारण मुळात शिरूर लोकसभा मतदारसंघावर आता तुम्ही ज्यांचे मित्र पक्ष आहात त्या भाजपने (BJP) दावा केला आहे. हे सर्व शिरुर मतदारसंघही जाणतो आणि दिल्लीतील भाजपचे चाणक्य देखील जाणतात की या उमेदवारी बाबत अनेकांच्या मनात शंका आहेत.

शिरुर लोकसभा मतदारसंघाबाबत आजवर आपल्याला उमेदवारी दिली
तर आपण खासदार होता मात्र आपले आमदार मात्र निवडून येत नाहीत.
याला दोन अपवाद आहेत अन्यथा 15 वर्षात आपली खालची पाटी कोरी आहे.
आपल्याला लोकांनी नाकारले आहे. त्यामुळे सुसंस्कृत बोला. आपल्या सारख्या नेत्याने अस बोलू नये. आपल्या बोलण्यात संधीसाधू वाटता. 2014 ला मी आपला प्रचार केला याबद्दल वाईट वाटलं, अस सांगत कोल्हेंनी पाटलांना टोला लगावला.

 

Web Title : Maharashtra Politics News | amol-kolhe-big-statement-says-shivajirao-adhalrao-patil-in-touch-with-sharad-pawar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा