Pune PMC Kids Festival | महापालिकेच्यावतीने आयोजित बालोत्सवाला पहिल्या दिवशी अडीच हजारांहून अधिक बालक- पालकांची हजेरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune PMC Kids Festival | पुणे महापालिकेच्यावतीने अर्बन ९५ अंतर्गत सारसबाग येथे आयोजित बालोत्सवाचे आज उदघाटन झाले. पहिल्याच दिवशी अडीच हजारांहून अधिक बालक- पालकांनी हजेरी लावली. यावेळी मुलांसाठी आयोजित खेळांमध्ये मुले हरखून गेली. (Pune PMC Kids Festival)

पुणे महापालिकेने वॅन लीर फाउंडेशनच्या सहकार्याने १४ ते १७ डिसेंबर दरम्यान सारसबाग येथे बालोत्सवाचे आयोजन केले आहे. सहा वर्षापर्यंतच्या मुलांचे आरोग्य, मानसिक व शारिरीक विकासाशी संबधित खेळ, तसेच मुलांचे संगोपन करताना तज्ज्ञांचे मार्गदर्शन या विषयावरील पालकांसाठीच्या कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे उदघाटन आज नॅशनल बुक ट्रस्टचे संचालक युवराज मल्लिक, सिनेअभिनेत्री प्राजक्ता माळी, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उपायुक्त संजय माने, वॅन लीर फाउंडेशनच्या इशपिता सिन्हा यांच्या उपस्थितीत झाले. (Pune PMC Kids Festival)

बालोत्सवाच्या पहिल्या दिवशी शहरातील १५ अंगणवाडी आणि बालवाड्यांतील २, ६७० मुले आणि पालकांनी
सहभाग नोंदवला. यावेळी जादूचे खेळ, कोडी सोडवणे, पपेट शो, गोष्टी सांगणे आदी खेळांचे आयोजन करण्यात आले होते.
नॅशनल बुक ट्रस्टचे युवराज मल्लिक आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी महापालिकेच्यावतीने आयोजित या
उपक्रमाचे कौतुक करताना बाल विकासासाठी सर्व घटकांनी पुढे यायला हवे, असे मत व्यक्त केले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Job Fair | दत्ताभाऊ सागरे यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात रोजगार मेळावा

Ambadas Danve | अंबादास दानवेंचा भुजबळांवर थेट आरोप, जरांगेंचे आंदोलन बदनाम करण्याचा ‘हा’ प्रयत्न

Pune Crime News | पार्ट टाईम जॉबच्या बहाण्याने धनकवडी येथील तरुणीची आर्थिक फसवणूक

Pune Pimpri Chinchwad Crime News | पतीचा काटा काढण्यासाठी आधी विषप्रयोग, नंतर दिली सुपारी; पोलीस तपासात पत्नीचे कारनामे आले समोर