Pune PMC News | पुणे महापालिकेमध्ये समाविष्ट 23 गावांमधील ड्रेनेजलाईनसाठी बँकांकडून 550 कोटी रुपये कर्ज उचलणार

कमी व्याजदर आणि दीर्घकालिन मुदतीसाठी कर्ज पुरवठा करणार्‍या बँकांचे प्रस्ताव मागविणार – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | महापालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या २३ गावांमध्ये ड्रेनेज लाईन आणि मैलापाणी प्रक्रिया केंद्र Sewage Treatment Plants (STP Plants Pune) उभारणीसाठी दीड हजार कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या कामांसाठी आवश्यक जमिन ताब्यात आलेल्या ठिकाणी पहिल्या टप्यात कामे करण्यात येणार आहे. यासाठी ५५० कोटी रुपये कर्ज काढण्यात येणार आहे. कमी व्याजदर आणि दीर्घ मुदतीचे कर्ज देउ शकणार्‍या बँकांनी महापालिकेकडे प्रस्ताव सादर करावेत, यासाठी येत्या दोन दिवसांत जाहिरात काढण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांनी दिली. (Pune PMC News)

महापालिकेमध्ये २३ गावांचा समावेश होउन तीन वर्षांहून अधिकचा काळ लोटला आहे. या गावांमध्ये पाणी पुरवठा, रस्ते, ड्रेनेज लाईन, आरोग्य केंद्र यासारख्या प्राथमिक व अत्यावश्यक सुविधा उभारण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. पाणी पुरवठा योजनेसाठी आराखडा तयार करण्यात आला असून टप्प्याटप्प्याने कामेही सुरू करण्यात आली आहेत. यासोबतच या गावांमध्ये ड्रेनेज लाईनची व्यवस्था करण्यासाठीचाही आराखडा तयार करण्यात आला असून यासाठी सुमारे दीड हजार कोटी रुपये खर्च आहे. (Pune PMC News)

ड्रेनेज लाईनसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च असल्याने जागतिक पातळीवर अर्थ पुरवठा करणार्‍या संस्थांकडूनही प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. त्याचवेळी बँकांकडूनही कमी व्याजदर आणि दीर्घकालीन मुदतीचे प्रस्ताव मागविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील जाहिरात येत्या दोन दिवसांत प्रसिद्ध करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये ड्रेनेज लाईन तसेच एसटीपी प्लांट बांधण्यासाठी जेवढी जागा ताब्यात आली आहे आणि उपलब्ध आहे, तेथील कामासाठी ५५० कोटी रुपये कर्ज पुरवठ्यासंदर्भात ही जाहिरात असेल, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.

समाविष्ट ११ गावांतील ड्रेनेज लाईनची २९५ कोटी रुपयांची कामे मंदगतिने

महापालिकेमध्ये २०१८ मध्ये समाविष्ट झालेल्या ११ गावांतील ड्रेनेजलाईनची कामे सुरू झाली आहेत.
महापालिकेने याचा आराखडा तयार करून २९५ कोटी रुपयांची निविदा काढली आहे.
परंतू जागेच्या उपलब्धमुळे कामाला म्हणाविशी गती नाही.
११ गावातील कामे महापालिकेच्या निधीतून करण्यात येत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Krushi Utpanna Bazar Samiti | पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संचालक मंडळ
आल्यानंतर पुन्हा शिवनेरी पथावर अतिक्रमणाला सुरुवात !

Manoj Jarange Patil | त्यांना राज्यात अशांतता पसरवायची असेल, पण…, भुजबळांच्या ‘त्या’ ऑडिओ क्लिपवर
जरांगेंची प्रतिक्रिया