Pune PMC News | पुणे मनपाच्या आरोग्य विभागाकडून शहराच्या 4 भागांत गोवरच्या साथीच्या पार्श्‍वभूमीवर सर्वेक्षण; अतिरिक्त महापालिका आयुक्त रविंद्र बिनवडे यांची माहिती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | राज्यात प्रामुख्याने मोठ्या शहरांमध्ये गोवरची साथ सुरू झाल्याने पुणे महापालिकेने आतापासूनच विशेष दक्षता घेतली आहे. याचाच एक भाग म्हणून महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकांनी आज कोंढवा, भवानी पेठ, येरवडा आणि आंबेगाव येथील दाट लोकवस्त्यांमध्ये सर्वेक्षण केले. सुदैवाने जानेवारीपासून आतापर्यंत शहरात १२५ गोवरची संशयित मुले सापडली. एनआयव्हीकडे तपासणीसाठी दिलेले त्यांचे नमुने निगेटीव्ह आले आहेत. मात्र, मुंबईतील साथीचा विचार करून प्रशासन दक्षता घेत असल्याची माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त रविंद्र बिनवडे (Ravindra Binwade PMC) यांनी दिली. (Pune PMC News)

 

गेल्या काही महिन्यांपासून मुंबई व परिसरात गोवरचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. प्रामुख्याने लहान मुलांमध्ये आढळणार्‍या या आजाराचे मुंबई शहरामध्ये अधिक रुग्ण आढळले असून काहींचा बळी देखिल गेला आहे. कोरोनानंतर संसर्गजन्य रोगाकडे गांभीर्याने पाहाणार्‍या प्रशासनाने गोवरची गंभीर दखल घेतली आहे. गोवरची लक्षणे व उपाययोजनांबाबत प्रशासनाकडून सातत्याने जनजागृती सुरू आहे. महापालिकेच्या पथकाने आज कोंढवा, भवानी पेठ, येरवडा आणि आंबेगाव परिसरातील दाट लोकवस्त्यांमध्ये सर्वेक्षण केले. याबाबतच अहवाल यायला रात्री उशिर होईल. परंतू प्राथमिक माहितीनुसार गोवरचा एकही रुग्ण आढळलेला नाही, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी दिली. (Pune PMC News)

कोरोना लसीकरणाबाबत मुस्लिम समुदायामध्ये जनजागृती
कोरोना लसीकरणासाठी महापालिकेने पहिल्या दिवसापासूनच पुढाकार घेतला आहे. याला यशही आले आहे.
परंतू मुस्लिम समुदायामध्ये लसीकरणाचे प्रमाण खूपच अत्यल्प आहे. कोरोनाचे रुग्ण कमी झाले असले तरी चीनमधील परिस्थिती पाहाता,
परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहोत. गोवरच्या सर्वेक्षणादरम्यान कोरोना लसीकरणाबाबतही मुस्लिम समुदयामध्ये जनजागृती करण्यात येत आहे.
मशिदींचे मौलाना तसेच मदरशांमध्ये शिक्षण देणार्‍या शिक्षकांचीही भेट घेउन
लसीकरणाबाबत जनजागृती करण्याबाबत आवाहन करण्यात येत असल्याची माहिती रविंद्र बिनवडे यांनी दिली.

 

Web Title :-  Pune PMC News | A survey by the Health Department of Pune Municipality in the background of measles outbreak in 4 parts of the city; Information of Additional Municipal Commissioner Ravindra Binwade

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Abdul Sattar On Thackeray Group | “एखाद्या महिलेनं मला चोर, गद्दार म्हंटलं तर कसं सहन करणार’? अब्दुल सत्तार यांचा प्रश्न

Bigg Boss Marathi | बिग बॉस मराठीच्या घरात ‘या’ कलाकारांनी घेतली वाईल्ड कार्ड एन्ट्री

BCCI-Guinness Book Of World Record | गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमचा मोठा विश्वविक्रम; ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने घेतली दखल