Pune PMC News | निविदा मंजुरीनंतर 6 महिन्यांत वर्क ऑर्डर न दिल्यास खातेप्रमुखांवर कारवाई; महापालिका आयुक्त व प्रशासक विक्रम कुमार यांचा आदेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | प्रशासकाच्या भुमिकेतून मागील तीन महिन्यांत विविध धडाकेबाज निर्णय घेणारे महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner and Administrator Vikram Kumar) यांनी खात्यांच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यासाठी आणखी एक पाउल उचलले आहे. महापालिकेच्या विविध खात्यांमार्फत विकास कामांच्या निविदा (PMC Tender) मागविण्यात येतात. परंतू विहीत मुदतीत त्या सादर न केल्याने मंजुर होत नाहीत किंवा मंजुर झाल्यातरी त्या कामांचे कार्यादेश (वर्क ऑर्डर) दिले जात नाही. यापुढे निविदा मंजुर झाल्यानंतर सहा महिन्यांत वर्क ऑर्डर (PMC Work Order) न दिल्यास त्या रद्द करण्याचा आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिला आहे. (Pune PMC News)

 

महापालिकेच्या विविध खात्यांमार्फत विकासकामे तसेच महसुली कामांच्या निविदा काढण्यात येतात. या निविदांना मंजुरी दिल्यानंतर ठेकेदाराला वर्क ऑर्डर देण्यात येते. निविदेत ठरविलेल्या कालावधीत हे काम करणे ठेकेदारांवर बंधनकारक असते. काही अडचणी असल्यास अनेकदा कामांना साधक बाधक विचार करून मुदतवाढही देण्यात येते. परंतू काही कामांच्या निविदा काढल्यानंतर त्या मंजुरीसाठी ठेवण्यात येतच नाहीत. काही वेळेस मंजुरी दिली तरी ठेकेदाराला वर्क ऑर्डर देण्यात येत नाही. या प्रलंबित निविदांसाठी खात्याकडून पुढील आर्थिक वर्षात तरतूद उपलब्ध करून मान्यतेसाठी सादर केल्या जातात. काही प्रकल्प आणि विकास कामांबाबत अनेकदा जाणीवपूर्वक ही पद्धत वापरण्यात येत असल्याचे महापालिका आयुक्त व प्रशासक विक्रम कुमार यांच्या निदर्शनास आली. (Pune PMC News)

या पार्श्‍वभूमीवर विक्रम कुमार यांनी कडक पावले उचलली आहेत.
निविदा मंजुरीसाठी न ठेवणे अथवा विहीत कालावधी वर्क ऑर्डर न देणे याबाबी कार्यालयीन शिस्तिस अनुसरून नाहीत,
असा ठपका विक्रम कुमार यांनी ठेवला आहे. यापुढील काळात खात्यांमार्फत काढण्यात
आलेल्या सर्व निविदा मंजुर केल्या दिवसापासून सहा महिन्याच्या कालावधीत वर्क ऑर्डर देण्यात यावीत.
सहा महिन्यात वर्क ऑर्डर न दिल्यास त्या निविदा रद्द करण्यात याव्यात.
फक्त न्यायप्रविष्ट निविदा याला अपवाद राहातील. भविष्यात विहीत मुदतीत वर्क ऑर्डर न दिल्यास संबधित
खातेप्रमुखांना जबाबदार धरण्यात येईल, अशी कडक भुमिकाही विक्रम कुमार यांनी घेतली आहे.

 

Web Title :- Pune PMC News | Action against department heads for non-issuance of work order within 6 months after approval of tender; Order of Pune Municipal Commissioner and Administrator Vikram Kumar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shinde-Fadnavis Government | सरकारचे नाथ ‘एकनाथ’, पण दबदबा ‘देवेंद्रां’चाच?

 

Pune Crime | पुण्यातील गँगस्टर शरद मोहोळ तडीपार

 

CM Eknath Shinde | एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप; म्हणाले – ‘माझे कायम खच्चीकरण’