CM Eknath Shinde | एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप; म्हणाले – ‘माझे कायम खच्चीकरण’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde-Fadnavis Government) विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपल्या भाषणांमध्ये शिवसेनेसह (Shivsena) इतर विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेनेत आपल्यावर कसा अन्याय झाला हे सांगताना थेट उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनाही नाव न घेता लक्ष्य केले. शिवसेनेत माझे सातत्याने खच्चीकरण झाले, असा आरोप शिंदे यांनी यावेळी केला.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी संघटनेत आपल्या कसा अन्याय झाला हे सांगताना म्हटले की, महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi government) स्थापन झाले त्या वेळी मुख्यमंत्री करणार, अशी चर्चा होती; पण स्वत:च मुख्यमंत्री झाले. त्याआधी 2014 मध्ये भाजप (BJP) आम्हाला उपमुख्यमंत्री द्यायला तयार होते; पण मला उपमुख्यमंत्री करावे लागू नये यासाठी ते पद शिवसेनेने घेतले नाही. शिवसेनेत सातत्याने माझे खच्चीकरण झाले.

 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी (Shivsena Chief Balasaheb Thackeray) आम्हाला शिकवले की, अन्याय सहन करू नका, त्याविरोधात पेटून उठा. त्यांच्या शिकवणीनुसार अन्यायाविरोधात उठाव केला; पण आम्ही गद्दार नाही. आम्ही कालही शिवसैनिक होतो, आजही शिवसैनिक आहोत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता एकनाथ शिंदे म्हणाले, तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आम्ही जन्माला आलो नाही.

विधान परिषद निवडणुकीच्या (Vidhan Parishad Election) निर्णय प्रक्रियेत पक्षाने कसे वगळले हे सांगताना एकनाथ शिंदे म्हणाले, राज्यसभा निवडणुकीवेळी बाहेरची तीन मते आणूनही विधान परिषद मतदान रणनीतीमधून मला वगळले. विधान परिषद मतदानाच्या दिवशी शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निवडून येतील याची निश्चिती करून मगच बाहेर पडलो. आमदारांना दूरध्वनी करण्यास सुरुवात केली आणि सगळे गोळा होऊ लागले.

 

आमदारांच्या घरांवर आणि कार्यालयांवर हल्ले केले. माझ्या घरावर दगड मारण्याची हिंमत असलेला अजून जन्माला आलेला नाही.
माझ्यावर प्रेम करणारे इतके आहेत की, हल्ला केला तर मधमाश्यांसारखे कार्यकर्त्यांचे मोहोळ उठेल.
शिंदे पुढे म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या (Swatantryaveer Savarkar) विरोधात भूमिका घेणार्‍या
काँग्रेससारख्या (Congress) पक्षाबरोबर आघाडी सरकारमध्ये बसणे आमच्या आमदारांना रुचत नव्हते.
उद्धव ठाकरे यांना पुन्हा भाजपसोबत युती करण्यास सांगा, असे शिवसेनेचे आमदार मला भेटून सतत सांगत होते.
मी पाच वेळी उद्धव ठाकरे यांच्याकडे विषय काढला; पण त्यात यश आले नाही.

 

Web Title :- EM Eknath Shinde | CM eknath shinde allegation on former cm and shivsena chief uddhav thackeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | हौसेसाठी पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला दत्तवाडी पोलिसांकडून अटक

 

Vegetables For Cholesterol | कोलेस्ट्रॉल शोषून घेऊन रक्त वाहिन्यांना स्वच्छ आणि मजबूत बनवू शकतात ‘या’ 5 भाज्या

 

Lower Cholesterol Diet | 30 वर्षाच्या वयात खायला सुरूवात करा ‘या’ 5 गोष्टी, वृद्धत्वापर्यंत शरीरात शीरणार नाही कोलेस्ट्रॉल