Pune PMC News | मुलाच्या मृत्यूनंतर पुणे महापालिकेला आली जाग, बांधकाम थांबवण्याचे दिले आदेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | बाणेर येथील गणराज चौकाजवळ शाळेतून घरी जाणाऱ्या रुद्र केतन राऊत (वय-9) याच्या डोक्यात बांधकामांवरील सळईचा गट्टू डोक्यात पडला. या अपघातात बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर पुणे महापालिकेने (Pune PMC News) बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत जागेवर जाऊन पाहणी केली. त्यानंतर हे बांधकाम थांबवण्याची नोटीस संबंधितांना देण्यात आली आहे.

बाणेर येथील गणराज चौकाजवळ एका इमारतीचे काम सुरु आहे. हे काम ओम हाऊसिंगचे विकसक अजित कर्नावट, यशदा ब्रदर्श चे वसंत काटे व आर्किटेक्ट मंगेश भांडेकर हे करीत आहेत. बुधवारी दुपारी साडेचारच्या सुमारास इमारतीच्या वरील मजल्यावरून सळईचा गट्टू रस्त्यावरून जाणाऱ्या रुद्र राऊत याच्या डोक्यात पडला. यामध्ये गंभीर दुखापत झाल्याने त्याला ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले. याठिकाणी उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच बुधवारी बांधकाम विभागाच्या (PMC Construction Department) अधिकाऱ्यांमार्फत जागेवर जाऊन पाहणी करण्यात आली.

अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत याठिकाणी 13 मजली आरसीसी काम पूर्ण झाले आहे. इमारतीचे काम करत असताना वरच्या मजल्यावरुन अंदाजे एक ते दीड फूट लांबीचा स्टील बारचा बंडल सेफ्टी नेट तोडून रस्त्यावरुन जाणाऱ्या लहान मुलाच्या डोक्यावर पडला. अधिकाऱ्यांनी केलेल्या जागा पाहणीत बांधकाम व्यावसायिकाने सुरक्षिततेची उपाययोजना केल्याचे दिसून
आले नाही. तसेच बांधकाम अटींचे उल्लंघन केल्याचे दिसून आले. (Pune PMC News)

यानंतर पुणे महापालिकेने संबंधित विकसक व आर्किटेक्ट यांना काम थांबवण्याची नोटीस देण्यात आली आहे.
तसेच कामगारांना या इमारतीचे कोणतेही काम न करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
या घटनेनंतर पुणे महापालिकेने सर्व बांधकाम व्यावसायिकांना सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

बांधकाम साईटवरील सळई डोक्यात पडून 9 वर्षाच्या शाळकरी मुलाचा मृत्यू, बाणेर परिसरातील घटना