Pune PMC News | सुभोभिकरणासाठी एक कोटी रुपयांच्या कुंड्या, झाडे खरेदी करण्याचा निर्णय रद्द – अतिरिक्त महापालिका आयुक्त विकास ढाकणे

ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune PMC News | जी २० परिषदेच्या (G 20 Summit Pune) निमित्ताने उड्डाणपुल आणि रस्त्यांच्या सुशोभिकरणासाठी उद्यान विभागाच्यावतीने मोठ्या आकाराच्या कुंड्या आणि शोभीवंत विदेशी प्रजातीची झाडे खरेदीसाठी निविदा (Tender PMC Pune) राबविली होती. परंतू या कुंड्या आडि झाडांच्या दराबाबत संशय निर्माण झाल्याने प्रशासनाने (PMC Administration) ही खरेदीच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कुंड्या आणि झाडे खरेदीसाठी सुमारे एक कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली होती. (Pune PMC News)

शहरात जून महिन्यांत दोन टप्प्यात होणार्‍या जी २० आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी चौक, रस्ते आणि उड्डाणपुलांवर सुभोशीभकरण करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून महापालिकेने नगर रस्ता तसेच, बाणेर व बावधन परिसरातील सात उड्डाणपुलांवर सुशोभीकरणासाठी मोठ्या आकाराच्या कुंड्या आणि त्यामध्ये रोपणासाठी १० ते १२ फूट उंचीची विदेशी प्रजातीची शोभीवंत झाडे खरेदी करण्यासाठी दोन स्वतंत्र निविदा काढल्या होत्या.

निविदा काढतानाच त्या एस्टीमेट कमिटीकडे मान्यतेसाठी जाणार नाहीत याची दक्षता म्हणून स्वतंत्रपणे दोन निविदा काढल्या. कुंड्या आणि झाडांचे दरही वाढीव असल्याबाबत माध्यमांनी वृत्त दिले होते.
यावर बाजारातील किंमती पडताळूनच खरेदीचा निर्णय घेण्यात येईल, असे आश्‍वासन महापालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांनी दिले होते.
त्यानुसार शहरातील नर्सरींमध्ये चौकशी केल्यानंतर झाडांचे दर हे महापालिकेच्या एस्टीमेटच्या तुलनेत मोठा फरक असल्याचे निदर्शनास आल्याने आयुक्तांनी खरेदी रद्द करण्याचे आदेश दिले.
त्यानुसार निविदा देखिल रद्द करण्यात आल्याची माहीती अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे
(PMC Additional Commissioner Vikas Dhakne) यांनी दिली. (Pune PMC News)

निविदा मागविण्यापुर्वीच मेट्रो पिलरवरील रोषणाई देखिल वादात

जी २० परिषदेनिमित्त महापालिकेच्या विद्युत विभागाने ढोले पाटील क्षेत्रिय कार्यालयाअंतर्गत मेट्रोच्या पिलरवर
विद्युत रोषणाई करण्याची निविदा ९ जून रोजी प्रसिद्ध केली.
या निविदेची मुदत १६ जून आहे. परंतू विद्युत विभागाने रविवारी अर्थात १० जून रोजीच रोषणाईचे काम करून
घेतल्याचे उघडकीस आले आहे.
यासाठी देखिल ४९ लाख ८३ हजार रुपयांची निविदा आहे. निविदा येण्यापुर्वीच आणि ती उघडण्यापुर्वीच विद्युत विभागाने रोषणाईचे काम करून घेतल्याने या कामातही अनियमीतता झाल्याचे उघड झाले आहे.
याबाबत विद्युत विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदुल यांच्याकडे विचारणा केली असता, ते म्हणाले जी २०
परिषदेनिमित्ताने काही कामांमध्ये ऐनवेळी बदल करण्यात आला.
शहर चांगले दिसावे यासाठी मेट्रो पिलरवर रोषणाईचे काम करून घेण्यात आले आहे.
अशी कामे करणारे दोनच ठेकेदार असून निविदेपेक्षा कमी दरानेच त्यांचे बिलिंग करण्यात येईल.

Web Title :  Pune PMC News | Cancellation of decision to buy pots, trees worth Rs.1 crore for beautification – Additional Municipal Commissioner Vikas Dhakne

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mula Mutha Riverfront Development | होय, हे परदेशातील नव्हे तर हे आहे आपल्या मुळा-मुठाचे बदलणारे सौंदर्य (PHOTOS)

Pune Pimpri Chinchwad Crime News | पत्ते खेळताना झालेल्या भांडणातून एकाचा खून

ACB Trap On Talathi News | 50 हजाराची लाच घेताना सराईत लाचखोर तलाठ्यास अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक