Pune PMC News | पुढील काळात होणार्‍या लिपिक भरती प्रक्रियेत उमेदवाराची शैक्षणिक आर्हता 10 वी उत्तीर्ण ऐवजी पदवीधारक करण्यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्नशील

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | पुणे महापालिकेच्या वतीने Pune Municipal Corporation (PMC) पुढील काळात होणार्‍या भरती प्रक्रियेमध्ये (PMC Recruitment) लिपिक पदासाठीच्या उमेदवारांसाठी शैक्षणिक आर्हता १० वी उत्तीर्ण ऐवजी पदवीधारक करण्याचे सूतोवाच महापालिकेतील अधिकार्‍यांनी दिले आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाने लिपिक पदासाठीची शैक्षणिक आर्हता यापुर्वीच १० वी ऐवजी पदवी अशी केली असून त्याच धर्तीवर हे बदल करण्यासाठी आमचे प्रयत्न असल्याचे महापालिकेतील उच्च पदस्थ अधिकार्‍याने सांगितले. (Pune PMC News)

 

आकृतीबंध अंतिम होण्याच्या प्रक्रियेस विलंब लागल्याने पुणे महापालिकेमध्ये तब्बल एक दशकानंतर मोठ्याप्रमाणावर थेट नोकर भरती प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये कनिष्ट अभियंता, अतिक्रमण निरीक्षक, विधी सहाय्यक आणि लिपिक पदांच्या सुमारे ४१८ जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे. विशेष असे की यातील निम्मी पदे हे लिपिक वर्गाची होती. लिपिक पदासाठी सुमारे ६५ हजार अर्ज आले होते. परिक्षेचा निकाल लागल्यानंतर यामध्ये सर्वोच्च गुणांनी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची आरक्षणनिहाय कागदपत्र व तांत्रिक प्रक्रिया सुरू आहे. (Pune PMC News)

लिपिक पदासाठी १० वी उत्तीर्ण, टायपिंग आणि तीन वर्षांचा अनुभव अशा प्रामुख्याने अटी होत्या.
त्यामुळे अवघ्या २०० पदांसाठी तब्बल ६५ हजार अर्ज आले होते.
अलिकडच्या काळामध्ये सर्वच शासकिय कार्यालयांमध्ये संगणकावर काम होते.
विविध विभागांमध्ये काम करत असताना कायदेशीर आणि तांत्रिक बाबींची माहिती असणे ही अत्यावश्यक बाब झाली आहे.
गतीमान प्रशासनासाठी उच्च शिक्षीत आणि अनुभवी कर्मचारी वर्गाचे योगदान मोठे ठरते.
यामुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाने देखिल लिपिक पदासाठीची आर्हता दहावी ऐवजी पदवी अशी केली आहे.
याच धर्तीवर महापालिकेमध्ये पुढील काळात लिपिक वर्गाची पदभरती करताना उमेदवाराची शैक्षणिक आर्हता दहावी ऐवजी पदवी करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती महापालिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.

 

Web Title :- Pune PMC News | In the upcoming clerk recruitment process, the municipal administration is trying to make the candidate’s educational qualification a graduate instead of 10th pass

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune CP Retesh Kumaarr | रितेश कुमार यांनी स्विकारली पुणे पोलिस आयुक्तपदाची सूत्रे (VIDEO)

Sanjay Raut | “कुणालाही हे मान्य नाही की राजभवनात बसून…”, संजय राऊतांची राज्यपालांवर टीका

Governor Appointed MLA | राज्यपाल नियुक्त आमदारांची सुनावणी लांबणीवर, विधानपरिषद सभापतीपदाच्या निवडणुकीत ट्विस्ट