Pune PMC News | जाहिरात होर्डींग्जच्या बदल्यात स्वच्छतागृहांच्या देखभाल दुरूस्ती ! महापालिकेने प्रायोगीक तत्वावर काढली चार स्वच्छतागृहांची निविदा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune PMC News | मोक्याच्या ठिकाणच्या सार्वजनिक स्वच्छतागृहांची व्यवस्थीत देखभाल व्हावी यासाठी महापालिकेने (Pune Municipal Corporation) प्रथमच जाहिरात हक्काच्या (Advertising Hoarding) बदल्यात स्वच्छतागृहांच्या देखभाल दुरूस्तीची निविदा (Tender For Maintenance Repair Of Toilets In Pune) काढली आहे. प्रायोगीक तत्वावर येरवडा (Yerwada), खराडी (Kharadi) आणि एअरपोर्ट रोडवरील (Airport Road Pune) चार स्वच्छतागृहांसाठी निविदा काढण्यात आली आहे. (Pune PMC News)

महापालिकेच्यावतीने सार्वजनिक स्वच्छतागृह उभारण्यात आली आहे. या स्वच्छतागृहांची देखभाल दुरूस्तीची कामे ठेकेदारांच्या मार्फतीने केली जातात. यासाठी महापालिका दरवर्षी लाखो रुपये खर्च करते. याचाच पुढचा भाग म्हणून महापालिकेने खर्चामध्ये बचत करण्यासाठी जाहिरात हक्काच्या बदल्यात स्वच्छतागृहांच्या देखभाल दुरूस्तीची संकल्पना पुढे आणली आहे. याची प्रायोगीक पातळीवरील सुरूवात येरवडा येथील दोन, खराडी आणि एअरपोर्ट रोडवरील वर्दळीच्या रस्त्यांवरील स्वच्छतागृहांची देखभाल दुरूस्ती केली जाणार आहे. (Pune PMC News)

याबदल्यात संबधितांला चारही स्वच्छतागृहांवर मिळून ९०० चौ. फुट क्षेत्र जाहिरातीच्या होर्डींगसाठी उपलब्ध करून
दिले जाणार आहे. निविदा प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर पहिले सहा महिने या स्वच्छतागृहांची डागडुजी आणि
सुशोभीकरणासाठी असतील. यानंतर पुढील १० वर्षे संबधित निविदाधारकाने स्वच्छतागृहांची देखभाल दुरूस्ती
करायची आहे.याबदल्यात संबधितांला चारही स्वच्छतागृहांवर मिळून ९०० चौ. फुट क्षेत्र जाहिरातीच्या होर्डींगसाठी
उपलब्ध करून दिले जाणार आहे. निविदा प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर पहिले सहा महिने या स्वच्छतागृहांची डागडुजी आणि सुशोभीकरणासाठी असतील. यानंतर पुढील १० वर्षे संबधित निविदाधारकाने स्वच्छतागृहांची देखभाल दुरूस्ती करायची आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC Fort Competition | पुणे महानगरपालिकेची किल्ले स्पर्धा गुरुवारपासून, विजेत्यांना रोख बक्षिसे

Pune Krushi Utpanna Bazar Samiti | सुरक्षारक्षकांची फौज तैनात असताना ‘मार्केटयार्डात’ शेतमालाच्या चोर्‍या वाढल्या; शेतकरी व विक्रेते हवालदील

ACB Trap On Maharashtra Jail Police | लाच घेताना कारागृहाचे तीन कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात, 2 महिला कर्मचाऱ्यांचा समावेश