Pune PMC News | उरूळी देवाची आणि फुरसुंगी गावे महापालिकेतून वगळण्याचा निर्णय राजकिय ! गावे वगळण्याचा निर्णय घेतल्यास न्यायालयीन आणि रस्त्यावरचा लढा उभारणार

0
389
Pune PMC News | The decision to exclude Uruli Devachi and Fursungi villages from the municipal corporation is political! If the village is decided to be excluded, court and street battles will ensue
file photo

मिळकत कर कमी करा आम्हाला महापालिकेतच राहायचेय – ग्रामस्थांची मागणी

पुणे – Pune PMC News | उरूळी देवाची (Uruli Devachi) आणि फुरसुंगी (Fursungi, Pune) गावे महापालिकेतून वगळून स्वतंत्र नगरपालिका करण्याचा निर्णय संपुर्णत: राजकिय आहे. काही व्यावसायीकांच्या फायद्यासाठी आणि पराभवाचा बदला घेण्यासाठी माजी मंत्री विजय शिवतारे यांनीच हा डाव रचला आहे. दोन्ही गावातील बहुसंख्य सर्वसामान्य ग्रामस्थांची मागणी केवळ मिळकत कराचे दर कमी करून गावे महापालिकेतच ठेवावी अशी आहे. हवे तर महापालिकेने गावांमध्ये मतदान घेउन निर्णय घ्यावा, असे आवाहन करतानाच उरूळी देवाची आणि फुरसुंगी ग्रामस्थांनी गावे महापालिकेतून वगळण्याचा निर्णय घेतल्यास न्यायालयीन लढ्यासोबतच रस्त्यावर अभूतपुर्व लढा उभारण्याचा इशारा आज पत्रकार परिषदेत दिला. (Pune PMC News )

ग्रामस्थांच्यावतीने माजी सरपंच उल्हास शितोळे, विलास भाडळे, राजेंद्र बाजारे, अनिरुद्ध पाचपुते, गणेश शेवाळे, विशाल भाडळे, जितेंद्र तिवारी यांनी आज पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत गावे वगळण्याच्या निर्णयाचा तीव्र विरोध केला. २०१७ मध्ये देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असतानाच उरूळी देवाची आणि फुरसुंगीसह ११ गावांचा महापालिकेत समावेश करण्यात आला आहे. तसेच तेच उपमुख्यमंत्री असताना ही गावे महापालिकेतून वगळूण स्वतंत्र नगरपालिका करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. फडणवीस यांच्या तत्कालीन मंत्रीमंडळातील राज्यमंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) हे याच मतदारसंघातून प्रतिनिधीत्व करत होते. २०१९ च्या निवडणुकीतील पराभव जिव्हारी लागल्याने ते ग्रामस्थांचा बदला घेत आहेत. यासाठीच त्यांनी वाढीव मिळकत कर आलेल्या मूठभर गोदाम व अन्य व्यावसायींकाना हाताशी धरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडून ही दोन्ही गावे महापालिकेतून वगळण्याचा घाट घातला आहे. (Pune PMC News)

महापालिकेत समावेश झाल्याने कचरा डेपोमुळे बाधित येथील नागरिकांना चांगल्या सुविधा मिळू लागल्या आहेत. नगरपालिका झाल्यास तिचा कारभार सुरू होण्यास आणखी पाच ते सहा वर्षे लागणार आहेत. महापालिकेने केलेल्या टीपी स्किममुळे येथे सुनियोजीत विकास होणार आहे. जमिनीचे दर वाढवून नागरी जीवनमान उंचावणार आहे. परंतू नगरपालिका केल्यास ही दोन्ही गावे बकाल होतील. यामुळे गावे महापालिकेतच असावीत, फक्त महापालिकेने या दोन्ही गावांसोबतच समाविष्ट ३४ गावांतील मिळकत कर कमी करावा अशी आमची मागणी आहे. या मागणीसाठी आम्ही न्यायालयातही गेलो आहोत. गावे वगळून प्रश्‍न सुटणार नसून आणखीनच चिघळेल आणि ग्रामस्थ संकटात लोटले जातील, याकडे आम्ही शासन आणि महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधत आहोत.

शासनाच्या आदेशानुसार महापालिकेने गावे वगळण्याचा ठराव करू नये.
लोकनियुक्त नगरसेवकांची मान्यता नसताना महापालिकेने धोरणात्मक निर्णय घेउ नये,
अशी आमची महापालिका आयुक्त आणि प्रशासकांना विनंती आहे.
गावे वगळण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यापुर्वी यावर दोन्ही गावांतील ग्रामस्थांचे मतदान घ्यावे असे आमचे
आवाहन आहे. यानंतरही निर्णय घेतला गेल्यास आम्ही न्यायालयात जाउ असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
तसेच ही प्रक्रिया थांबविण्यासाठी पुढील आठवड्यापासून अगदी महापालिकेपासून रस्त्यावर उतरून तीव्र
आंदोलन करण्याचा इशाराही या ग्रामस्थांनी दिला आहे.

Web Title :-Pune PMC News | The decision to exclude Uruli Devachi and Fursungi villages from the municipal corporation is political! If the village is decided to be excluded, court and street battles will ensue

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime | दररोज एक टक्का जास्तीचा नफा देण्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाला लाखोंचा गंडा, भोसरी मधील प्रकार

Neha Malik | नेहा मलिकचा बोल्ड अंदाज; कर्वी फिगर करत वेधले सर्वांचे लक्ष