Pune PMC News | मुंढवा येथील गोठेधारकांच्या पुर्नवसनाची प्रक्रिया अनेक महिन्यांपासून ठप्प; ‘मालमत्ता विभाग’ अतिरिक्त आयुक्तांच्या ‘रडार’वर

सोमवारी मुंढवा गोठेधारकांचे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी महापालिकेत बैठक

 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | मुंढवा येथील गोठेधारक व अन्य व्यावसायीकांना सुधारीत प्लॉटींग करण्यासाठी मालमत्ता विभागाकडून अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. यामुळे शहरातील गोठेधारकांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया ठप्प झाली असून महापालिकेचे उत्पन्नही बुडत असल्याची दखल वरिष्ठ पातळीवर घेण्यात आली आहे. यासाठी अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली येत्या सोमवारी तातडीने बैठक बोलविली असून मुंढवा येथील जागेचे मोनार्क कंपनीकडून फेरसर्वेक्षण करून सुधारीत प्लॉटींग व अन्य सेवा सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकार्‍यांनी दिली. (Pune PMC News)

 

शहरातील विविध भागांमध्ये असलेल्या गुरांच्या गोठ्यांचे मुंढवा येथील महापालिकेच्या जागेमध्ये पुर्नवसन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर महापालिकेने गेल्या काही वर्षांपासून प्रत्यक्षात पुर्नवसनाला सुरूवातही केली आहे. दरम्यान, महापालिकेने काही महिन्यांपुर्वी ८८ गोठेधारकांचे पुर्नवसन करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली. यामध्ये क्षेत्रीय कार्यालयाकडून आलेल्या प्रस्तावांनुसार गोठेधारकांची अधिकार्‍यांच्या उपस्थितीत मिटींगही झाली. या बैठकीमध्ये रिक्त जागांवर ८८ गोठेधारकांना प्लॉटस्ही उपलब्ध करून देण्यात आले. विशेष असे की कोरोना काळात ही बैठक ऑनलाईन झाली होती. जागा वाटपानुसार काही गोठेधारांनी महापालिकेची फी देखिल बँकेमध्ये भरली.

 

मात्र, प्रत्यक्षात वाटपामध्ये मिळालेला प्लॉट क्रमांक जागेवर अस्तित्वात असला तरी प्रत्यक्षात त्याठिकाणी यापुर्वीच गोठा असल्याचे काहींच्या निदर्शनास आले. काही ठिकाणी पक्क्यास्वरूपाचे बांधकाम करून तेथे भंगार व अन्य व्यवसाय सुरू असल्याचेही ज्यांना जागा वाटप करण्यात आली आहे, त्यांच्या निदर्शनास आले. तर काही प्लॉटस्ची जागा ही चक्क नदीपात्रातही असल्याचे आढळून आले. यामुळे ८८ पैकी जवळपास ३० गोठेधारकांनी वस्तुस्थितीनिहाय पत्र पाठवून महापालिकेकडे नवीन प्लॉटस्ची मागणी केली. दरम्यानच्या काळामध्ये गोठे वाटपामध्ये काही माननीयांनी अधिकार्‍यांना हाताशी धरून हेराफेरी केल्याच्या तक्रारीदेखिल प्रशासनाकडे आल्या होत्या. भाजपचे सरचिटणीस संदीप लोणकर यांनी यासंदर्भात आयुक्तांकडे तक्रार करून गैरव्यवहार करणारे अधिकारी व माननीयांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशीही मागणी केली होती. यानंतर गोठे वाटपाची प्रक्रिया तूर्तास स्थगित करण्यात आली आहे. (Pune PMC News)

आरोग्य विभागाने यावर्षी मार्चमध्ये गोठेधारक, माती पासून विविध वस्तू तयार करणारे कुंभार व्यावसायीक तसेच भट्टयांचा व्यवसाय करणार्‍या व्यावसायीकांच्या पुर्नवसनासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या जागांचे मोनार्क या कंपनीमार्फत मॅपिंग करून सुधारीत प्लॉटींग करण्याबाबत मालमत्ता विभागाशी पत्रव्यवहार केला आहे.
परंतू ९ महिने उलटूनही त्यावर अद्याप कुठलिही कार्यवाही झालेली नाही.
या ठिकाणच्या गोठ्यांच्या परिसरात जाण्यासाठीचे कच्चे रस्ते असून अन्य सुविधा देखिल नाहीत.
त्यामुळे पावसाळ्यात दुचाकींवरून दुधाचे कॅन नेणे देखिल शक्य नसल्याने आहे त्या गोठे धारकांचेही नुकसान होते.

 

मुंढवा येथील गोठेधारक व अन्य व्यावसायीकांच्या नियोजनबद्ध पुर्नवसनासाठी मालमत्ता विभागाकडून विलंब झाला आहे.
यासंदर्भात येत्या सोमवारी बैठक बोलविण्यात आली आहे.
यामध्ये मोनार्क संस्थेकडून जागेचे फेरसर्वेक्षण आणि सुधारीत प्लॉटींग बाबतही निर्णय घेण्यात येईल.
यासोबतच या जागेवरील अतिक्रमण काढून टाकण्यासोबतच उद्देशापेक्षा अन्य व्यावसायीक कारणांसाठी वापर केला
जात असलेले भूखंड देखिल ताब्यात घेण्याबाबत प्रामुख्याने निर्णय घेण्यात येईल.

 

– रविंद्र बिनवडे, अतिरिक्त महापालिका आयुक्त. २

 

Web Title :- Pune PMC News | The process of rehabilitation of cowherds in Mundhwa has been stalled for several months; ‘Property Department’ on Additional Commissioner’s ‘Radar’

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune CP Retesh Kumaarr | रितेश कुमार यांनी स्विकारली पुणे पोलिस आयुक्तपदाची सूत्रे (VIDEO)

Sanjay Raut | “कुणालाही हे मान्य नाही की राजभवनात बसून…”, संजय राऊतांची राज्यपालांवर टीका

Governor Appointed MLA | राज्यपाल नियुक्त आमदारांची सुनावणी लांबणीवर, विधानपरिषद सभापतीपदाच्या निवडणुकीत ट्विस्ट