Pune PMC News | फ्लॅट ताब्यात देण्यापुर्वीचा मिळकत कर भरण्यास टाळाटाळ करणार्‍या बिल्डरविरूध्द ‘रेरा’ कडे तक्रार करणार : मनपा आयुक्त विक्रम कुमार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | विकसकाला भोगवटा पत्र मिळाल्यानंतर त्या तारखेपासूनच मिळकत कराची आकारणी होते. परंतू अनेकदा विकसक संबधित सदनिकांचा ताबा हे दोन ते तीन वर्षांनी सदनिकाधारकांना देतात. या कालावधीतील मिळकत कर भरण्यास विकसकांकडून टाळाटाळ करण्यात येते. त्यामुळे दोन ते तीन वर्षाच्या मिळकत कराचा बोजा हा संबधित सदनिकाधारकांवर पडतो, अशा अनेक तक्रारी महापालिकेकडे आल्या आहेत. यासंदर्भात माहिती घेउन सदनिका ताब्यात दिल्या नसताना याचा बोजा सदनिका धारकांवर टाकणार्‍या विकसकांबाबत महापालिका ‘रेरा’ कडे (RERA) तक्रार करणार असल्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांनी सांगितले. (Pune PMC News)

 

बाळासाहेबांची शिवसेनेचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी २०१७ मध्ये महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या ११ पैकी ९ गावांतील प्रतिनिधींसोबत या गावातील विविध प्रश्‍नांबद्दल महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतली. या भेटीमध्ये मिळकत कराचा वरिल मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावर आयुक्त विक्रम कुमार यांनी वरिल आश्‍वासन दिले. या बैठकी संदर्भात माहिती देताना विक्रम कुमार यांनी सांगितले, की ११ गावांपैकी उरूळी देवाची व फुरसुंगी वगळता उर्वरीत ९ गावातील मिळकत कराबाबत चर्चा झाली. या गावांतील ज्या मिळकतधारकांना अधिकची बिले आहे, अशा मिळकत धारकांनी मिळकत कर विभागाकडे पुढील १५ दिवसांत तक्रार करावी. अतिरिक्त आयुक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार (Dr. Kunal Khemnar PMC) यांच्या अध्यक्षतेखाली दोन अधिकार्‍यांची समिती स्थापन करून या तक्रारींचा अहवाल तयार करण्यात येईल. या अहवालावरून वाढीव मिळकत कराबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. (Pune PMC News)

या गावांमधील पाणी पुरवठ्या संदर्भात सल्लागार नेमण्यात आला असून काही गावांमध्ये कामेही सुरू करण्यात आली आहेत.
ही दीर्घकालिन कामे असून तात्पुरत्या स्वरूपात पुर्वीचीच यंत्रणा वापरून या गावांमध्ये तत्काळ पाणी पुरवठा सुरळीत
करण्यासाठी अधिक्षक अभियंता अनिरूद्ध पावसकर यांच्या नेतृत्वाखाली पथक पुढील सात दिवसांत संबधित गावांतील
पाणी पुरवठा यंत्रणेचा आढावा घेउन उपाययोजना सुचवतील व त्यानुसार कामे करण्याचा या बैठकीत निर्णय घेण्यात
आल्याचे विक्रम कुमार यांनी नमूद केले.

 

Web Title :- Pune PMC News | Will complain to ‘Rera’ against builders who refrain from paying income tax before the flat possession: Municipal Commissioner Vikram Kumar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | परदेशात व्यवसाय करण्याचे आमिष दाखवून पुण्यातील व्यावसायिकाला 37 लाखांना गंडा

Pathaan Controversy | दीपिका पदुकोणचा जुना व्हिडीओ व्हायरल; ” रंगाने धर्म निवडला नाही……”

Parag Bedekar Passes Away | मनोरंजनसृष्टीवर शोककळा; अभिनेते पराग बेडेकर यांचं निधन