Pune PMC Property Tax News | मिळकत करातील 40 टक्के सवलतीसाठी PT 3 फॉर्मची मुदत; 30 नोव्हेंबरपर्यंत वाढविण्याचा महापालिकेचा निर्णय

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC Property Tax News | शहरातील ज्या निवासी – मिळकतींची मिळकतकरातील ४० टक्के सवलत रद्द करण्यात आली आहे, अशा मिळकतींना ही सवलत पुन्हा लागू करण्यासाठी महापालिकेकडून पीटी – ३ अर्ज (PT 3 Form PMC) भरून द्यायची मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. महापालिकेने अगोदर १५ नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली होती. परंतु, शासकीय सुट्यांमुळे अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची मिळकत कर संकलन विभागाचे प्रमुख अजित देशमुख (Ajit Deshmukh PMC) यांनी दिली. (Pune PMC Property Tax News)

महापालिकेतर्फे पुणेकरांना त्यांच्या निवासी मिळकतीसाठी १९७० पासून मिळकतकरातील सर्वसाधारण करात ४० टक्के सवलत दिली जात होती. मात्र, त्यावर महालेखापालांनी आक्षेप घेतल्यानंतर २०१८ पासून ही सवलत रद्द करण्यात आली. त्यानुसार महापालिकेने २०१९ पासून नवीन कर आकारणी केलेल्या मिळकतींची ४० टक्के सवलत काढून घेतली. तसेच जीआयएस मॅपिंग सर्व्हेमध्ये भाडेतत्वावर देण्यात आल्याचे आढळलेल्या मिळकतींचीही ही सवलत काढून घेतली. (Pune PMC Property Tax News)

मात्र, नागरिकांनी जोरदार विरोध केल्यानंतर राज्य सरकारने ही सवलत पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २०१९ पासून ४० टक्के सवलत रद्द झालेल्या मिळकतधारकांनी पीटी ३ फॉर्म भरून द्यायचा आहे. शहरातील सुमारे तीन लाख मिळकतधारकांची ही सवलत रद्द झालेली असली आतापर्यंत ७८ हजार ९३८ मिळकतधारकांनी हे अर्ज भरले आहेत.

अनेक नागरिकांना याबाबत पुरेशी माहिती नसल्याने तसेच दिवाळीचा सण व सुट्यांचा विचार करता
पीटी ३ फॉर्म सादर करण्यास मुदतवाढ देण्याची मागणी केली जात होती.
पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर व सुहास कुलकर्णी,
माजी नगरसेवक प्रशांत बधे, सामाजिक कार्यकर्ते सुनिल माने यांनीही आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली होती.
याला महापालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar)
यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ३० नोव्हेंबरपर्यंत ही मुदतवाढ केल्याची माहिती देशमुख यांनी दिली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP Sharad Pawar | लोकसभेसाठी शरद पवार गटाची जोरदार तयारी, ‘इतक्या’ जागा लढवणार