Police Suspended | मद्यधुंद अवस्थेत वाहतूक पोलिसाने उगारली भर रस्त्यात तलवार, परिसरात दहशत माजवणारा पोलीस तडकाफडकी निलंबित

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मद्यधुंद अवस्थेत वाहतूक पोलिसाने (Police Suspended) भर रस्त्यात तलवार उगारून दहशत (Terror) माजवल्याची घटना घडली आहे. ही घटना विश्रांतवाडी भागात घडली असून तलवार उगारणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित (Police Suspended) करण्यात आले आहे. पोलीस कर्मचाऱ्याच्या निलंबनाचे आदेश वाहतूक शाखेचे पोलीस (Pune Traffic Branch) उपायुक्त विजयकुमार मगर (DCP Vijayakumar Magar) यांनी दिले आहेत. याबाबत पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात (Vishrantwadi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

विजय उर्फ करण लक्ष्मण जाधव (Vijay alias Karan Laxman Jadhav) असे निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे (Pune Police) नाव आहे. जाधव मुंढवा वाहतूक शाखेत (Mundhwa Traffic Branch) कार्यरत आहेत. धानोरीतील जाणता राजा चौकात जाधव तलवार (Sword) घेऊन दहशत पसरवत असल्याची माहिती विश्रांतवाडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जाधव याला ताब्यात घेतले.

 

पोलिसांनी केलेल्या चौकशीत जाधव मुंढवा वाहतूक शाखेत पोलीस कर्मचारी (Traffic Police) असल्याचे उघडकीस आले.
जाधव याने मद्यपान केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्याच्यावर बेकायदा शस्त्र बाळगणे,
सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घातल्या प्रकरणी गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला. जाधव याची चौकशी करण्यात आली.
जाधव याने पोलीस दलाची प्रतिमा मलिन केल्याने त्यांना निलंबित (Police Suspended) करण्याचे आदेश पोलीस उपायुक्तांनी दिले.

 

Web Title :- Police Suspended | a drunken traffic police officer sword and terrorized pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 

Pune Metro News | पुणे : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेचा महत्वाचा टप्पा पूर्ण, 2000 सेगमेंटची उभारणी

Maharashtra Political News | ‘भावी मुख्यमंत्री’ कोण? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, म्हणाले-‘2024 ची निवडणूक…’

Devendra Fadnavis | ‘कुणाची सुपारी घेऊन बारसूला विरोध करत आहात?’, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल