ACB Trap News | पोलीस ठाण्यात लाच घेताना पोलीस कर्मचारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap News | दाखल गुन्ह्यात तक्रारदार यांच्या बाजूने आरोपपत्र दाखल करण्यासाठी 5 हजार रुपये लाच स्वीकारताना (Accepting Bribe) पोलीस हवालादाराला (Police Constable) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau) अटक केली आहे. उदलसिंग मानसिंग जारवाल Udal Singh Man Singh Jarwal (वय 53 रा. यशवंतनगर अंबड रोड जालना जि. जालना) असे लाचखोर पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. एसीबीने (ACB Trap News) ही कारवाई बुधवारी (दि.18) जालना शहरातील तालुका पोलीस ठाण्यात केली.

याप्रकरणी 28 वर्षाच्या व्यक्तीने जालना एसीबीकडे (Jalna ACB) तक्रार केली आहे. तक्रारदार याच्या विरूद्ध तालुका पोलीस ठाण्यात (Taluka Police Station) आयपीसी 279, 323, 327, 337, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. दाखल गुन्ह्याचा तपास तक्रारदार यांचे बाजुने करुन लवकर दोषारोप पत्र दाखल करण्यासाठी पोलीस हवालदार जारवाल यांनी 5 हजार रुपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी बुधवारी एसीबी कार्यालयात तक्रार केली.

एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता पोलीस हवालदार जारवाल यांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी
करुन स्वीकारण्याचे मान्य केले. त्यावरून तालुका पोलीस ठाण्यात सापळा रचण्यात आला.
तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताना पोलीस हवालदार जारवाल याला रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्यावर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. (ACB Trap News)

ही कारवाई औरंगाबाद परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे (SP Sandeep Atole) यांच्या मार्गदर्शनाखाली
जालना एसीबीचे पोलीस उपअधीक्षक किरण बिडवे (DySP Kiran Bidve), पोलीस अंमलदार गजानन घायवट,
गजानन खरात, अतिश तिडके, गणेश बुजडे, गणेश चेके, जावेद शेख, संदीपान लहाने, चालक विठ्ठल कापसे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | ललित पाटीलच्या अटकेनंतर देवेंद्र फडणवीस यांचे सूचक विधान, म्हणाले-‘आता अनेकांची तोंडं…’ (व्हिडिओ)

Drug Mafia Lalit Patil | पुणे पोलिसांकडून माझ्या जीवाला धोका, ललित पाटीलचा कोर्टात दावा; सोमवारपर्यंत पोलीस कोठडी