Pune PMC To FDA Administration | एफडीए ने अन्न परवाना नूतनीकरणावेळी व्यावसायीकांना पाणी पुरवठा विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र (NOC) बंधनकारक करावे; महापालिका आयुक्तांचे FDA प्रशासनाला पत्र

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC To FDA Administration | शहरामध्ये अन्न व औषध प्रशासन (FDA) कडून अन्न परवाना नूतनीकरण करणार्‍या व्यावसायीकांना महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र बंधनकारक करावे (NOC Of PMC Water Supply Department), असे पत्र महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Vikram Kumar PMC) यांनी एफडीएच्या आयुक्तांना पाठविले आहे. (Pune PMC To FDA Administration)

 

शहरातील अन्न पदार्थ विक्रेत्यांना एफडीए परवाना देते. तसेच परवान्यांचे नूतनीकरणही याच विभागाकडून करण्यात येते. पुर्वी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडुन हे परवाने दिले जात होते. अन्न पदार्थ विक्रेत्या व्यावसायीकांना महापालिका मीटरद्वारे पाणी पुरवठा करते. आरोग्य विभाग हे परवाने देत असताना अथवा नूतनीकरण करत असताना व्यावसायीकांना पाणी पुरवठा विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र अनिवार्य असे. त्यामुळे व्यावसायीकांकडील पाणी पुरवठयाची बिलेही गोळा होण्यास मदत होत होती.

परंतू हे काम एफडीएकडे गेल्यानंतर तेथे पाणी पुरवठा विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंद करण्यात आले.
यामुळे व्यावसायीक पाणीपट्टी भरण्याकडे दुर्लक्ष करू लागले आहेत.
अनेक व्यावसायीकांची पाणीपट्टीची थकबाकी वाढत असून याचा परिणाम महापालिकेच्या उत्पन्नावर होत आहे.
यामुळे एफडीए ने परवाना देताना आणि नूतनीकरणाच्यावेळी व्यावसायीकांकडून महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र बंधनकारक करावे,
अशी सूचना महापालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांनी पत्राद्वारे केली आहे. (Pune PMC To FDA Administration)

 

Web Title :- Pune PMC To FDA Administration | FDA to make mandatory No Objection Certificate (NOC) from water supply department for traders at the time of food license renewal; LETTER FROM MUNICIPAL COMMISSIONER TO FDA ADMINISTRATION

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Jalgaon ACB Trap | 25 हजाराच्या लाच प्रकरणी नायब तहसिलदारासह कोतवाल अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

Maharashtra Political Crisis | 9 महिन्यानंतर सत्तासंघर्षाची सुनावणी पूर्ण, निकाल कधी?

Pune Crime News | दोषारोपपत्र दाखल करण्यापूर्वीच खुनातील आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर