Pune PMC Toilet Seva App | शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांचे लोकेशन आता एका क्लिकवर ! महापालिकेचे टॉयलेट सेवा ऍप नागरिकांच्या सेवेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –Pune PMC Toilet Seva App | शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृह कुठे आहेत? याची माहिती आता टॉललेट सेवा ऍपवर (TOILET SEVA APP) एका क्लिकवर समजणार आहे. एवढेच नव्हे तर स्वच्छतागृहातील सुविधांबाबतचा फीडबॅक आणि तक्रार करणेही नागरिकांना सहज शक्य होणार आहे. नागरिकांनी या ऍपचा अधिकाअधिक वापर करावा असे आवाहन महापालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन प्रमुख आशा राउत (PMC Deputy Commissioner Asha Raut) यांनी केले आहे. (Pune PMC Toilet Seva App)

 

अमोल भिंगे यांनी तयार केलेल्या या ऍपमध्ये शहरातील १ हजार १८३ सार्वजनिक स्वच्छतागृहे कुठे आहेत, याची माहिती देण्यात आली आहे. ऍपचा वापर करून नजीकचे स्वच्छतागृह सर्च करणे, तेथे असलेल्या सुविधा पहाता येणार आहेत. या ऍपमध्ये फिल्टरींगची देखिल सुविधा असून त्यानुसार वॉशबेसिन, पाणी, लिक्विड सोप किंवा सॅनिटायजर, डस्टबिन, लाईटस, महिलांसाठीच्या सॅनिटरी नॅपकिन्स अशा सुविधा असलेल्या स्वच्छतागृहांची माहिती स्वतंत्रपणे पाहायला मिळणार आहे.

या ऍपवर स्वच्छतागृहांतील सुविधांबाबत, स्वच्छतेबाबत फीडबॅक आणि तक्रार करण्याची देखिल सुविधा असणार आहे. तसेच सुविधांसाठी गुणांकन देण्याची देखिल सुविधा असेल. गुरूवार २२ जून रोजी या ऍपचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे. नागरिकांनी सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर वाढविण्यासाठी या ऍपचा अधिकाअधिक वापर करावा, असे आवाहन राउत यांनी केले आहे.

 

Web Title :  Pune PMC Toilet Seva App | Location of public toilets in the city now on one click! Municipal toilet service app at the service of citizens

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा