Pune PMC-Traffic Police | पुणे महापालिकेने वाहतूक पोलिसांना त्यांचे ‘कर्तव्य’ निदर्शनास आणून दिले ! बंदी असलेल्या रस्त्यांवर अवजड वाहनांना अटकाव करावा; बस, रिक्षा अधिकृत थांब्यांवरच थांबतील अशी कार्यवाही करावी

 

आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पुणे वाहतूक पोलिसांना पत्र

 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC-Traffic Police | मागील काही दिवसांपासून शहरात अभूतपुर्व वाहतूक कोंडी होत आहे. या पार्श्‍वभूमीवर शहरातील वाहतूक कोंडीला (Traffic Jam In Pune City) कारणीभूत अतिक्रमणांवर कारवाई करणार्‍या पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation (PMC) वाहतूक पोलिसांना (Pune Traffic Police) त्यांचे ‘कर्तव्य’ निदर्शनास आणून दिले आहे. शहरात बंदी असतानाही होणारी अवजड वाहतूक, बेकायदा प्रवासी वाहतूक करणारे रिक्षा चालक तसेच वर्दळीच्या रस्त्यांवर बिनदिक्कतपणे उभ्या करण्यात येणार्‍या रिक्षांवर उचित कार्यवाही करावी असे पत्रच वाहतूक पोलिसांना दिले आहे. (Pune PMC-Traffic Police)

 

शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे, सातत्याने होणारा मोठा पाउस आणि मेट्रोच्या कामांमुळे मागील काही आठवड्यांपासून शहरातील वाहतूक अक्षरश: कोलमडून पडली आहे. चोवीस तास पाणी पुरवठ्यासाठीच्या कामामुळे तसेच केबलसाठीच्या खोदाईमुळे शहरातील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. अशातच ठिकठिकाणी पदपथ आणि रस्त्यांवरील अतिक्रमणांमुळे वाहतुकीला प्रचंड अडथळे निर्माण होत आहेत. यामध्ये भर म्हणून की काय वाहतूक नियंत्रण करणारे पोलिस चौकांमधून जवळपास गायब झाले असून केवळ आडोशाला थांबून कारवाई करण्यामध्ये मग्न असल्याचे चित्र आहे. भरीस भर म्हणून शहराच्या मध्यवर्ती आणि छोट्या रस्त्यांवर बंदी असतानाही मोठ्या प्रमाणावरील वाहने बिनदिक्कतपणे येत असून कोंडीत भर घालत आहेत. यासोबतच अगदी लक्ष्मी रस्त्यासारख्या गजबजलेल्या रस्त्यावर थांबा नसतनाही रिक्षा चालकांच्या रांगाच्या रांगा लागलेल्या असतात. हीच परिस्थिती शिवाजी रोड, बाजीराव रोडवरही पाहायला मिळते. यासोबतच बेकायदेशीररित्या सीट वाहतूक करणार्‍या रिक्षाही बसथांबे परिसरात कोंडाळे करून थांबत असून यामुळे प्रवाशांसोबतच पीएमपीएमएल चालकांचे हाल होतात. यामुळे मोठ्याप्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. (Pune PMC-Traffic Police)

शहराच्या मध्यवर्ती भागातील रस्त्यांवर तर पी १, पी २ पार्कींगच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असून या ठिकाणी वाहने दुहेरी पार्क केली जातात. रस्त्यांसोबतच या समस्यांमुळे शहरातील वाहतूक कोंडीमध्ये मोठ्याप्रमाणावर भर पडत असून वाहतूक पोलिसांनी यावर कारवाई करावी, अशी मागणी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने केली आहे.

 

महापालिका स्तरावर रस्ते दुरूस्ती आणि नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. सततच्या पावसामुळे यामध्ये अडचणी येत आहेत. तसेच रस्त्याच्या कडेला असलेल्या अतिक्रमणांवरही कारवाई सुरू आहे. वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियंत्रणासाठी अधिकचे प्रयत्न केल्यास शहरातील वाहतूक सुरळित होईल, असा दावा महापालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.

शहरात १७ ऑक्टोबरला अभूतपूर्व पाउस झाला. हवामान विभागाने (IMD) पुढील काही दिवस मोठया पावसाचा अंदाज वर्तवला आहे. शहरात वाहतूक कोंडीचे प्रकार सातत्याने घडत आहेत.
बंदी असलेल्या रस्त्यांवरील अवजड वाहनांची वाहतूक (Transport Of Heavy Vehicles) याला कारणीभूत ठरत आहे.
तसेच बसेस व रिक्षा देखिल योग्य ठिकाणी थांबत नसल्याने वाहतुकीची समस्या निर्माण होत असल्याचे पाहाणीत दिसून आले आहे.
वाहतूक पोलिसांनी बंदी असलेल्या रस्त्यांवर अवजड वाहनांना अटकाव करावा.
बसेस व रिक्षा थांब्यावरच थांबतील यादृष्टीने उचित कारवाई करावी, असे पत्र वाहतूक पोलिस उपायुक्तांना दिले आहे.

 

सचिन इथापे, उप आयुक्त, आपत्ती व्यवस्थापन विभाग, पुणे महापालिका (Sachin Ithape, Deputy Commissioner, Disaster Management Department, PMC)

 

Web Title :- Pune PMC-Traffic Police | Pune Municipal Corporation pointed out their duty
to the traffic police! Heavy vehicles should be stopped on restricted roads; Action should
be taken that buses, rickshaws stop only at official stops

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा