Pune PMPML Bus Accident | पुणे : पीएमपीएमएल बसच्या चाकाखाली सापडून ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMPML Bus Accident | ज्येष्ठ महिला पीएमपीएमएल बस मध्ये चढत असताना अचानक दरवाजा लागला आणि प्रवासी महिला खाली पडली. त्यावेळी बस चालकाने हयगयीने बस पुढे नेल्याने बसचे पाठीमागील चाक पायावरुन गेल्याने महिला गंभीर जखमी झाली. महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. ही घटना 12 एप्रिल रोजी दांडेकर पुलाजवळील (Dandekar Pool) पीएमपीएमएल बस स्टॉपवर घडली.

काशीबाई पांडुरंग खुरंगळे (वय 60, रा. धायरी) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मल्हारी पांडुरंग खुरंगळे (वय-31 रा. दांडेकर पुल, सिंहगड रोड, पुणे) यांनी पर्वती पोलीस ठाण्यात (Parvati Police Station) फिर्याद दिली. त्यानुसार बसचालक दिलीपराव वामनराव लहाने (वय- 50, रा. टकलेनगर, मांजरी बु., पुणे) याच्यावर आयपीसी 279, 304(अ), 338 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मल्हारी खुरंगळे हे आई-वडील, मुलासह धायरी परिसरात राहतात.
मृत काशीबाई खुरंगळे या राजेंद्र नगर मध्ये राहणाऱ्या मुलाकडे आल्या होत्या.
फिर्यादी हे आई-वडिलांना परत घरी घेऊन जाण्यासाठी आले आणि दांडेकर पुल येथील पेट्रोलपंपाजवळील पीएमपीएमएल
बस स्थानकावर धायरीकडे जाणाऱ्या बसची वाट पाहत होते. थोड्या वेळात धायरी डीएसके विश्व जाणारी बस आली.

काशीबाई यांचे वय अधिक असल्याने त्यांना बसमध्ये चढता येत नव्हते.
फिर्यादी मल्हारी हे बहिणीच्या मदतीने आईला बसच्या पाठीमागील दरवाजातून चढवत होते.
अचानक बसचा दरवाजा बंद झाला आणि बस पुढे निघाली.
त्यामुळे काशीबाई खाली पडल्या आणि त्यांच्या डाव्या पायावरुन बसचे चाक गेले.
यात पायाचा चेंदामेंदा झाला तर उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली.

गंभीर जखमी झालेल्या काशीबाई खुरंगळे यांना उपचारासाठी ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
त्यांच्यावर उपचार सुरु असताना 14 एप्रिल रोजी निधन झाले. पीएमपीएमएल चालकाने हयगयीने, बदरकारपणे
बस चालवल्यामुळे ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NIBM Road Kondhwa Crime | पुणे : गाडीला धक्का लागल्याच्या कारणावरुन दोन गटात राडा, पोलीस अधिकाऱ्याचा महागडा मोबाईल फोडला

Rohit Pawar On Ajit Pawar | रोहित पवारांचा अजितदादांवर पुन्हा घणाघात, ”ते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत, 2019 पासून भाजपसोबत जाण्याचं प्लॅनिंग”

Sharad Pawar On Datta Bharne | शरद पवारांची दत्ता भरणेंवर सडकून टीका, ”इथं एकाला निवडून आणलं, तिकीट दिलं, मंत्री केलं, पण…”